महावितरणच्या कंत्राटी अभियंत्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – नादुरुस्त असलेले विद्युत रोहित्र दुरूस्त करण्यासाठी शेतकऱ्याकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या कंत्राटी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई काल दुपारच्या सुमारास शिल्लेगाव येथे करण्यात आली बाळू धोत्रे (32, सहाय्यक अभियंता लासुर स्टेशन) असे अटकेतील अभियंत्याचे नाव आहे. एका मल्टीसर्व्हिस एजन्सीमार्फत धोत्रे या महावितरण कंपनीच्या लासुर स्टेशन कार्यालयांतर्गत काम करत होता.

याविषयी अधिक माहिती अशी की, एका शेतकऱ्याच्या शेतातील रोहित्र नादुरूस्त झाल्याने त्याची दुरुस्ती करणे गरजेचे होते. तक्रारदार शेतकऱ्याने धोत्रे यांची भेट घेतली. त्याने हे काम करण्यासाठी शेतकऱ्याकडे दोन हजार रुपये मागितले. त्यानंतर शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी, हवालदार जी.एस. भताने, विलास चव्हाण, के.के. घुसिंगे, चालक शिंदे यांच्या पथकाने मंगळवारी शिल्लेगाव येथे सापळा रचून तक्रारदार यांना लाचेचा रकमेसह धोत्रेकडे पाठवले.

यावेळी शेतकऱ्याकडून दोन हजार रुपये लाच घेतात सापळा रचून बसलेल्या साध्या वेषातील एसीबीच्या पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave a Comment