MSRTC : प्रवाशांना मोबाईलमध्ये मिळणार ST चे लाईव्ह लोकेशन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MSRTC : आजही गावखेड्यामध्ये महाराष्ट्र शासनाची ST सार्वजनिक प्रवासामध्ये महत्वाची भूमिका बजावते. गावखेड्यामध्ये आजही लोक या लाल परीची आतुरतेने वाट पाहत असतात. आजही एसटीचा प्रवास करणाऱ्यांची काही कमी नाही. मात्र या प्रवासात एस टी ची अनेकदा वाट पहावी लागते. एस टी कुठेपर्यंत आली आहे. ती यायला किती वेळ लागणार आहे ? याची माहिती मिळत नाही मात्र आता सर्वत्र डिजिटलायझेशन झाल्यामुळे आपली लाल परी सुद्धा यात काही मागे नाही. आता एका ॲपच्या मदतीतून एसटीचं लाईव्ह लोकेशन (MSRTC) तुम्हाला मिळणार आहे. या ॲप्स नाव आहे एमएसआरटीसी ॲप. एसटी बाबाच्या अनेक प्रशनांची उत्तरं तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळणार आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने प्रवाशांच्या सोयी करता वेव्हिकल ट्रॅकिंग सिस्टीम व ‘MSRTC कम्प्युटर’ हे नवीन ॲप तयार करण्यात आले आहे. त्याचा वापरही सुरू झालाय. प्रवाशांचा प्रवास हा सुकर व्हावा या हेतूने हे ऍप विकसित करण्यात आले आहे. महामंडळाच्या या ॲपमध्ये ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम म्हणजेच जीपीएस यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. ज्याद्वारे प्रवाशांसाठी बसचा लाईव्ह लोकेशन पाहता येऊ शकते.

कोणत्या आहे सुविधा ? (MSRTC)

त्यामुळे सध्याच्या घडीला बस कुठे आहे ? हे प्रवाशांना घरबसल्या करणार असून ॲप मध्ये तिकीट आरक्षण, लोकेशन ट्रेकिंग सिस्टीम, बस मार्ग, महिला सुरक्षितता, मार्गस्थ वाहनातील बिघाड, वैद्यकीय मदत आणि अपघाती मदतीची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. याकरिता प्रवाशांना प्ले स्टोअर वर जाऊन ‘MSRTC कम्प्युटर’ॲप डाऊनलोड करायचे आहे.

मराठी आणि इंग्रजी भाषा

या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी आणि इंग्रजी भाषेत हे ॲप असल्यामुळे वापरण्यासाठी हे ॲप (MSRTC) अतिशय सोपे आहे. शिवाय अभिप्राय आणि तक्रारी देखील नोंदवण्याची सोय या ॲपमध्ये करण्यात आली आहे

कशी कराल तक्रार? (MSRTC)

या मोबाईल ॲप मध्ये तक्रारीसाठी विशेष कॉलम तयार करण्यात आलेला असून तक्रारींसाठी प्रवास वाहक चालक बस स्थिती, बस सेवा, ड्रायव्हिंग मोबाईल ॲप असं वर्गीकरण करण्यात आलं आहे. त्यासाठी तक्रारदाराला मोबाईल आणि वाहन एसटी क्रमांक (MSRTC) नोंदवावा लागतो.

अपघात झाल्यास मिळणार मदत (MSRTC)

बसचा अपघात झाल्यास या सेवेमुळे प्रवाशांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध होईल. याशिवाय महिलांना (MSRTC) बस मध्ये काही त्रास झाल्यास 100 किंवा 103 या क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.