MSRTC Buses : ST च्या ताफ्यात 2000 नवीन बसेस दाखल; वारकऱ्यांचा प्रवास सुखद होणार

MSRTC Buses
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MSRTC Buses । गाव तेथे एसटी असे घोषवाक्य असलेली लालपरी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावत असते. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असा एसटीचा प्रवास असल्याने प्रत्येकालाच एसटी बस हि आपल्या घरची किंवा हक्काची वाटते. महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ सुद्धा आरामदायी प्रवासासाठी नवनवीन बसेस आणत असते. आताही तब्बल ९ वर्षानंतर २००० नवीन बस ST च्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या बसेस पंढरीच्या वारीसाठी धावल्या जातील. त्यामुळे आषाढी वारीत भाविकांना या नवीन बसेसमधून प्रवास करता येणार आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना नव्या लालपरीतून सुखद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

पुणे विभागात ६५ लालपरी नव्याने दाखल- MSRTC Buses-

दरवर्षी आषाढी वारी आणि दिवाळीपूर्वी एसटीच्या ताफ्यात नवीन बस दाखल होत होत्या. त्यामुळे आषाढी वारीत वारकऱ्यांना आणि दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांना नवीन लालपरीचा प्रवास अनुभवता येत होता. मात्र, 2016 नंतर एसटी महामंडळाकडून नवीन बसची (MSRTC Buses) खरेदी झालीच नाही. त्यामुळे जुन्या बस मधूनच वारकऱ्यांना प्रवास करावा लागायचा. यावर्षी मात्र राज्यातील सर्व आगारांत एसटीच्या ताफ्यात नव्या लालपरी दाखल होत आहेत. नवीन बसेस अधिक आरामदायी असल्याने वारकऱ्यांना प्रवास अतिशय आरामात होण्याची अपेक्षा आहे. पुणे विभागात ६५ लालपरी नव्याने दाखल झाल्या आहेत. महामंडळाच्या ताफ्यात आतापर्यंत दीड हजार बस दाखल झाल्या आहेत. तसेच पुढील एक महिन्यात आणखी एक हजार बसेस येणार आहे.

वारकऱ्यांना टोल माफ, आरोग्य विमा-

दरम्यान, आषाडी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील वारकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील अशी माहिती एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल, पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असे शिंदेनी सांगितलं. तसंच, नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरूम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करावी, वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून घ्यावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसंच, नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरूम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करावी, वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून घ्यावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.