हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MSRTC Tourism Bus । तुम्ही सुद्धा एसटी चे शौकीन असाल आणि महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांना भे देण्याच्या विचारात असाल तर मित्रानो हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाअंतर्गत पुण्यातील स्वारगेट आगारातर्फे चार विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या पर्यटन बसच्या माध्यमातून तुम्ही अष्टविनायक, अक्कलकोट, रायगड, ५ ज्योतिर्लिंग, गाणगापूर अशा धार्मिक स्थळांना जाऊ शकता. आणि देवासमोर नतमस्तक होऊ शकता. एसटी बस च्या सुविधेमुळे भाविकांचा प्रवास हा आरामदायी होईल यात शंकाच नाही.
कोणत्या तारखेला कुठे प्रवास करता येईल? MSRTC Tourism Bus
‘पाच ज्योतिर्लिंग’ दर्शन सहल – ही सहल ३ दिवसांची असेल, त्यात महाराष्ट्रात असणाऱ्या पाच ज्योतिर्लिंगांना भेट देता येणार आहे. यामध्ये भीमाशंकर, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ यांमचा समावेश आहे. 19 ते 21 जुलै 2025 या दिवसांदरम्यान ही सहल आहे. तुम्ही निमआराम बसमधून प्रवास करू शकाल. ५ ज्योतिर्लिग तशी एकमेकांपासून लांब असल्याने अनेकदा प्रवास करताना अडचण येते. परंतु आता एसटीच्या विशेष पर्यटन सेवेमुळे भक्तांना मोठा फायदा होणार आहे.
अक्कलकोट-गाणगापूर सहल -याठिकाणी सुद्धा निमआराम बसनं 22 आणि 23 जुलै 2025 रोजी ही सहल करता येणार आहे. यामध्ये तुळजापूरचाही समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिराला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भक्त मोठ्या संख्येने येत असतात. अशा भक्तांसाठी हि मोठी सुवर्णसंधी म्हणावी लागेल. MSRTC Tourism Bus
अष्टविनायक दर्शन- 25- 26 जुलै 2025 दरम्यान दोन दिवसांच्या कालावधीत निमआराम एसटीनं अष्टविनायक दर्शन घडवलं जाईल. यामाध्यमातून तुम्हाला मोरगाव, सिध्दटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव अशा ठिकाणांना जाता येणार आहे.
रायगड दर्शनासाठी- 30 जुलै 2025 रोजी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडभेटीसाठी एकदिवसीय सहल नियोजित आहे. त्याठिकाणी सुद्धा निमआराम बसचा वापर केला जाणार आहे. रायगडावर जाऊन तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होऊ शकता.
एसटी महामंडळाच्या माहितीनुसार या प्रत्येक सहलीसाठी निमआराम बसचा (MSRTC Tourism Bus) वापर केला जाणार असून, तिकीट आरक्षणासंदर्भातील माहिती स्वारगेट आगारासह एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिली जाईल याची प्रवाशांनी नोंद घ्यावी असं सांगण्यात आलं आहे.