औरंगाबाद | कोरोनानंतर आता देशभरात ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकॉर्मयकॉसिस हा आजार डोकेवर काढत आहे. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना हा आजार होत आहे. शहरात दीड महिन्यात या आजाराचे 201 रुग्ण विविध रुग्णालयात दाखल झाले. त्यातील 16 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोना झाल्यानं नवीन चिंता सतावत आहे.
कोरोना संसर्गाचे आत्तापर्यंत शहरातील सुमारे 83 हजार नागरिकांना बाधा झाली. यातील 700 जणांचा मृत्यू झाला. 81 हजार रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले. पण ज्यांना कोरोनाचा जास्त त्रास झाला त्यांना आता म्युकॉर्मयकॉसिसचा आजार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने शहरातील खासगी रुग्णालयांकडून म्युकॉर्मयकॉसिस आजाराच्या रुग्णांची माहिती मागविली आहे. त्यानुसार शहरातील सहा हॉस्पिटलचे हॉस्पिटलने माहिती पाठवली आहे.
गेल्या दिड महिन्यात ब्लॅक संघर्ष म्हणजेच काळी बुरशी या आजाराचे एकूण दोनशे एक रुग्ण दाखल झाले आहेत. त्यातील 16 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. एमजीएम हॉस्पिटल मध्ये 73, एशियन हॉस्पिटल मध्ये 24, कमलनयन बजाज हॉस्पिटल मध्ये 5, धूत हॉस्पिटल मध्ये 3, एपेक्स हॉस्पिटल मध्ये 43, तर घाटी रुग्णालयात 50, रुग्ण दाखल झाले आहेत. यापैकी मधुमेही रुग्णांची संख्या 76, ऑक्सिजनची कमतरता असलेल्या रुग्णांची संख्या 110, स्टेरॉइडचे रुग्णांची संख्या 148 होती. सध्या 7 जणांवर उपचार सुरू आहेत.