सातारा जिल्ह्यात कोरोनासोबत म्युकर मायकोसिस : नवे 2 हजार 83 पाॅझिटीव्ह तर मुक्यर मायकोसिसचे 28 रूग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 83 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 633 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 19 हजार 903 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 48 हजार 739 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 25  हजार 433 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3390 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात 31 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

म्युकर मायकोसिसचे आतापर्यंत तीन बळी

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू असताना म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळू लागल्याने आरोग्य यंत्रणा अॅलर्ट झाली आहे. या आजाराने शनिवारी दोघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या आजाराचे 28 रुग्ण आढळले आहेत. एका बुरशीने होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. आतापर्यंत या आजाराने तिघांचा बळी गेलेला आहे.

Leave a Comment