असा बनवा खमंग मिक्स डाळ पराठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । पराठ्यांचे वेगवेगळे प्रकार आपण सध्या पाहत आहोत . आज आपण पाहणार आहोत मिक्स डाळ पराठा . हा पराठा बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते पाहुयात ,

साहित्य – ३ वाट्या कणीक, १/४ वाटी बारीक रवा, मीठ, १/२ तेल, ओवा

सारणाच साहित्य – १/४ वाटी प्रत्येकी तूर, चणा, मसूर, हरभरा डाळ, १ टे.स्पून आले-लसूण-मिरची पेस्ट, तिखट मीठ, अनारदाणा/आमचूर पावडर

कृती – कणीक, रवा, मीठ व तेल घालून भिजवून १ तास ठेवावे. नंतर मळून एकसारखे गोळे करावे. डाळी भिजवून २-३ तासांनी रवाळ वाटाव्यात.
तेल तापवून ओव्याची फोडणी करावी. डाळीचे मिश्रण घालून परतून २ वाफा आण्याव्यात. त्यात आले-लसूण-मिरची पेस्ट, तिखट, मीठ, कोथिंबीर, ग. मसाला घालून परतावे. आमचूर पावडर घालून उतरावे. कणकेचे व सारणाचे सारखे भाग करुन पराठा करुन लाटावे. हे पराठे पौष्टिक व चवदार होतात.

paratha

 

Leave a Comment