हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील आढळलेल्या गाडीतलं जिलेटीन हे नागपुरातल्या कंपनीत बनल्याचं आता पोलीस तपासात समोर आलंय. नागपूरच्या सोलार इंडस्ट्रीमध्ये हे जिलेटीन बनल्याचं आता समोर आलं आहे. कंपनीचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी ही माहिती दिली आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या कारमधील जिलेटीनच्या कांड्या नागपूर येथील इकॉनोमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत तयार झाल्याची माहिती मिळाली आहे. सोलर एक्स्प्लोझिव्ह ही जगातील चौथी मोठी स्फोटक तयार करणारी कंपनी आहे. विहीर खोदणे आणि खाण कामासाठी ही स्फोटकं प्रामुख्याने पुरविली जातात. सोलर इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी यासंबंधी मुंबई पोलिसांनी माहिती दिल्याचे सांगितले.
गुरूवारी मध्यरात्री १.३० वाजता मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन आला होता. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पार्क करून ठेवलेल्या कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या सोलर एक्सप्लोझिव्ह मध्ये तयार झाल्या आहेत. अशी माहिती या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली’, असे सत्यनारायण नुवाल यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’