नागपूर प्रतिनिधी | संपुर्ण गांव श्रमदानात गर्क असतांना नरखेडच्या वादग्रस्त मुख्याधिकारी माधुरी मडावी मात्र त्याच ठिकाणी हिंदी गाण्यावर बेधुंद नाचत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झालेला असुन श्रमदानाची ‘टर’ उडविल्याने जनतेमध्ये असंतोष खदखदत आहे. नरखेड नगर परिषद पासुन पाच किमी दुर असलेल्या गोंडेगाव येथे पाणी फाऊंडेशन तर्फे श्रमदानातुन खोदकाम सुरु होते.या श्रमदानात व्हीडीओ मध्ये बेधुंद होऊन नाचणाय्रा वादग्रस्त मुख्याधिकारी माधुरी मडावी देखिल आल्या होत्या. मुख्याधिकारी माधुरी मडावी ह्या श्रमदानाला गेल्या होत्या कि नाचायला अशा संतप्त प्रतिक्रिया जनमाणसातुन उमटायला लागल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागातील वादग्रस्त मुख्याधिकारी माधुरी मडावी ला बडतर्फ करण्याबाबत तत्कालिन नगर विकास राज्यमंत्री माननिय भास्कर जाधव यांनी २१ जुलै २०१२ ला पावसाळी अधिवेशनात विधिमंडळात घोषणा केली होती. परंतु आठ वर्षापासुन अद्याप बडतर्फ करण्यात आले नाही. दरम्यान, देसाईगंज जि गडचिरोली,रामटेक जि नागपुर , या नगरपरीषदने नगर परिषद पदाधिकारी व सदस्यांना वारंवार अॅट्रासिटीच्या खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देत असल्याने अविश्वास ठराव क्रमांक ५७१/२०१० अन्वये दि ८ जुन २०१० ला पारित करुन या अविश्वास ठराव्याच्या आधारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपिठात याचिका टाकुन अल्पावधीतच त्या ठिकाणाहुन स्थानांतरण केलेले आहे.अशाच प्रकारची तक्रार अकोला मनपा आयुक्त डॉ. लहाने यांच्या विरुद्ध देखिल तक्रार दिली होती. या वादग्रस्त मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्यावर देसाईगंज, रामटेक, अकोला, पवनी पोलीस स्टेशन मध्ये गंभीर गुन्हे दाखल असुन स्थानिक नागरीकांवर व तिच्या मनमानी भोंगळ कारभार व भ्रष्टाचार बाबतीत बातम्या प्रकाशित केल्यानेच पत्रकारांविरुध्द प्रत्येक नगरपरीषद क्षेत्रातील पोलीस स्टेशन मध्ये तिने खोट्या तक्रारी केल्या आहेत.
तथापी, नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या मूख्याधिकारी माधुरी मडावी हीचा दि .११.११.२००८ पासून परिविक्षाधीन कालावधी संपूष्ठात आलेला नसून रामटेक येथे कार्यरत असतांना त्यांचे विरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शि. व अ.) नियम १९७९ नियम ८ खाली प्रस्तावित केली असून सदर शिस्तभंग विषय कारवाई परिविक्षाधीन कालावधी दरम्यान असल्यामुळे कारवाई प्रलंबित असल्यास विभागीय चौकशी पूर्ण होई पर्यंत परिविक्षाधीन कालावधी वाढविण्यासाठी नगर विकास विभागाने राज्यपाल च्या आदेशानुसार ६ सप्टेंबर २०१६ ला काढलेला आहे.
ज्या ठिकाणी मुख्याधिकारी माधुरी मडावी कार्यरत होत्या त्या त्या ठिकाणी नेहमीच वादग्रस्त ठरल्या आहेत .प्रत्येक ठिकाणीच नगरपरीषद पदाधिकारी व सदस्यांविरुद्ध स्थानिक नागरीकांवर व पत्रकारांवर अॅट्रासिटीची खोट्या तक्रारी करित असून नुकत्याच भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे पोलीस स्टेशन पवनी येथे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता, सध्या भंडारा जिल्ह्यातील लाखांदुर नगर पंचायत चा अतिरिक्त पदभार असुन ई निविदा बाबतीत अनियमितेबाबत पत्रकार यांनी बातम्या प्रकाशित केल्याने तिथे ही पोलीस स्टेशन लाखांदुर ला खोट्या तक्रारी केली आहे.
तरी मुख्याधिकारी माधुरी मडावी हीला परिविक्षाधीन कालावधी पासुन अद्याप विभागीय चौकशी सुरूच असुन २१ जुलै २०१२ ला विधिमंडळात तत्कालिन नगर विकास राज्य मंत्री नामदार प्रकाश जाधव यांनी मुख्याधिकारी पदासाठी लायक नसलेल्या माधुरी मडावी हीला बडतर्फ करण्याची घोषणा केली होती. मंत्री महोदयांनी विधिमंडळात केलेल्या या घोषणेची तंतोतंत पालन करुन तात्काळ अंमलबजावनी करून बडतर्फ करुन विधिमंडळात दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करुन विधिमंडळाची गरिमा कायम राखावी अशी केल्या जात आहे…