Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत होणार मोठा बदल; या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | जुलैमध्ये महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात. आत्तापर्यंत या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आणि आता अनेक महिला या तिसऱ्या त्याची वाट पाहत आहे. अशातच आता पात्र असणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण योजनेबाबत एक सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडकी बहणी योजना (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) ही महाराष्ट्र सरकारने आणलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. सुरुवातीला ऑगस्ट महिन्यापर्यंत या योजनेचा अर्ज भरण्याची मुदत होती. परंतु सरकारने पुन्हा ही मुदत वाढून 30 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख घेतलेली आहे. परंतु अशातच हाती आलेल्या माहितीनुसार सर्वसामान्य जनतेतील सगळ्यांना फायदा होण्यासाठी आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

सध्या 30 सप्टेंबर 2024 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली जाणार असल्याची चर्चा देखील चालू आहे. ही अंतिम मुदत ऑक्टोबर अखेरपर्यंत असू शकते. असा दावा देखील केला जात आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार 24 सप्टेंबर पर्यंत या योजनेसाठी महाराष्ट्रातील जवळपास 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज स्वीकारले गेलेले आहे. आणि सप्टेंबर अखेर पर्यंत ही संख्या आणखीनच वाढणार आहे. जर सरकारने ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढवली, तर ही संख्या 3 कोटींच्या वर देखील जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. त्या जवळपास दीड कोटींपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. तसेच 29 सप्टेंबरला पात्र महिन्याच्या खात्यात तिसरा हप्ता येणार असल्याची माहिती देखील हाती आलेली आहे. आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळून 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचे पैसे लवकर जमा होणार आहे.

या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाही. त्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण 4500 रुपये दिले जाणार आहेत. परंतु सप्टेंबर महिन्यात अर्ज केले आहेत. आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत फक्त त्यांनाच हे पैसे मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेमध्ये (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana) सहभाग घेण्यासाठी महिलेचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. तसेच महिलेचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत विवाहित, विधवा, घटस्फोटीत, निराधार, अविवाहित या सगळ्या महिलांना लाभ मिळत आहे. त्याचप्रमाणे ज्या महिलेचा जन्म परराज्यात झालेला आहेत, परंतु तिने जर महाराष्ट्र राज्यात लग्न केले असेल, तरी देखील तिला या योजनेचा लाभ मिळणार आहे.