Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana |आपल्या देशातील जवळपास 75 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे आपले सरकार देखील शेतकऱ्यांच्या हिताचे नवनवीन निर्णय घेत असतात. जेणेकरून शेती करताना शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्यानंतर आता सरकारने कृषी पंप योजना आणली आहे. आता ही योजना नक्की काय आहे? आणि त्याचा लाभ कसा घेतला जाईल? याची सविस्तर माहिती घेऊया.
राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणली आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. आता या सौर कृषी पंपाचे शेतकऱ्यांना नक्की काय काय फायदे होणार आहेत हे आपण पाहूया.
सौर कृषी पंपाचे शेतकऱ्यांना होणारे फायदे
- यामुळे दिवसा शेतीपंपास विजेची उपलब्धता निर्माण होते.
- त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची वीज बिलापासून मुक्तता होते.
- डिझेल पंपाच्या तुलनेत याला काहीच खर्च येत नाही.
- हा सौर कृषी पंप पर्यावरण पूरक असणार आहे
- त्याचप्रमाणे औद्योगिक वाणिज्य आणि घरगुती वीज ग्राहकांवरील सबसिडीचा कृषी पंपामुळे फायदा होणार आहे.
सौर कृषी पंप योजनेची ठळक वैशिष्ट्ये | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana
- लाभार्थ्याची निवड ही त्याच्या पात्रतेनुसार होणार आहे.
- ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलश्रोत आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- पारंपारिक पद्धतीने कृषी पंपाकरता विद्युत जोडणी ज्या शेतकऱ्यांनी केलेली नाही त्यांना याचा लाभ मिळणार आहे.
- 5 एकरापर्यंत शेत जमीनधारकास 3 अश्वशक्ति सौर कृषी पंप आणि 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती कृषी पंप देण्यात येणार आहे.
- तसेच यापूर्वी शासनाच्या कुठल्याही योजनेद्वारे कृषी पंपाचा लाभ न घेतलेली शेतकरी त्याचप्रमाणे अतिदुर्गम भागातील लोक तसेच आदिवासी भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास प्राधान्य राहणार आहे.
सौर कृषी पंपाचे अर्ज करण्याची पद्धत
- यासाठी तुम्हाला कृषी सौर पंपसाठी महावितरणाच्या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
- त्याकरता कृषी पंपसाठी नवीन विज जोडणी पैशाची भरणा तसेच काही अनिवार्य गोष्टी म्हणजेच अर्ज क्रमांक पैसे भरल्याची पावती मंजुरी क्रमांक यांसारख्या गोष्टी द्याव्या लागणार आहे.
- ही सगळी माहिती दिल्यानंतर फॉर्मवर तुम्हाला माहिती भरून कागदपत्रांची प्रत देखील अपलोड करावी लागणार आहे.
- यामध्ये तुम्हाला सातबारा उतारा आणि आधार कार्ड द्यावे लागेल त्याचप्रमाणे तुमच्या जातीचे प्रमाणपत्र देखील द्यावे लागेल.