Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana | सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक विविध योजना आणलेल्या आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना नेहमीच फायदा होत असतो. शेती करताना विविध गोष्टींची गरज लागते आणि त्याच गोष्टींची पूर्तता करण्याच्या प्रयत्न सरकार करत असतात. सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 (Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana ) ही योजना आणलेली आहे. महाराष्ट्र सरकारने आणलेली ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक घटकाला चालना देण्यासाठी आणि राज्यात सौर ऊर्जा निर्मिती वाढवण्यासाठी आणलेली आहे.
सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकरी त्यांची जमीन सरकारला भाड्यावर देऊ शकतात. आणि ते दरवर्षी सरकारकडून हेक्टरी 1.25 लाख रुपये एवढी रक्कम मिळू शकतात. यासाठी शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. त्यांची शेती केवळ सरकारला द्यायची आहे. सौर कृषी वाहिनी योजनेसाठी ही जमीन सरकार घेतात आणि त्याचे तुम्हाला दरवर्षाला भाडे देखील मिळते. आता या योजनेचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेणार आहोत
या योजनेचे फायदे | Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana
- या योजनेअंतर्गत सरकारला जमिनीचा ताबा न देता शेतकऱ्यांना दरवर्षी उत्पन्न प्राप्त होते.
- या योजनेमुळे राज्यात सौर ऊर्जा निर्मिती देखील होणार आहे.
- त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे.
- या योजनेसाठी किमान 3 एकर आणि जास्तीत जास्त 50 एकर जमीन भाड्याने शेतकऱ्याला दिली जाऊ शकते.
- महावितरण वीज केंद्राच्या 5 किलोमीटरचा आत असलेले शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.
पात्रता
सरकारचे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक उत्तम संधी आहे.
यातून शेतकऱ्यांना दरवर्षी भाडेतत्त्वावर काही रक्कम देखील मिळेल आणि त्यांना या योजनेचा देखील फायदा होईल.