Mukhyamantri Vayoshri Yojana | आपले राज्य सरकार समाजातील विविध नागरिकांसाठी अनेक योजना आणत असतात. त्याचा फायदा अनेकांना होत असतो. सरकारने सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी एक विशेष योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे नाव वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojana ) असे आहे. या योजनेअंतर्गत 65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया खूप दिवसांपूर्वी सुरू झालेली होती. परंतु आता सरकारने पुन्हा एकदा या योजनेचा ऑफलाइन अर्ज करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत वाढ केलेली आहे. समाज कल्याण विभागाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.
सरकारच्या या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये मिळणार आहेत. वाढत्या वयासोबत अनेक शारीरिक व्याधी देखील निर्माण होतात . आणि त्यासाठी जेष्ठ नागरिकांना आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहता येऊ नये. यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवण यंत्र, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, निब्रेस, कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा यांसारखे अत्यावश्यक साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
या योजनेमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना निधीचे वितरण त्यांच्या वैयक्तिक आधार कार्ड संलग्न असणाऱ्या बँकेच्या खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने दिले जातील. ही रक्कम एक रकमी 3000 रुपये दिली जाणार आहे. अनेक लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहेत. परंतु समाजात आणखी असे अनेक लोक आहेत. ज्यांना अजूनही या योजनेची माहिती नाही. त्यामुळे त्यांना देखील या योजनेसाठी अर्ज करता यावा तसेच या योजनेचा लाभ घेता यावा. यासाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी सरकारने मुदत वाढ केलेली आहे.