Mukhyamantri Yojana Doot : सरकार देणार महिन्याला 10 हजार रुपये; काय आहे मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जनतेला आर्थिक लाभ व्हावा, त्यांचे जीवनमान सोप्प व्हावं यासाठी सरकारकडून सतत नवनवीन योजना आणल्या जातात. मात्र अनेकदा असं होते कि सरकारच्या योजना तळागाळातील लोकांना माहितीच नसतात आणि या योजनांचा लाभ घेण्यापासून अनेकजण वंचित राहतात. परंतु आता शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम (Mukhyamantri Yojana Doot) सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड सरकार कडून केली जाणार आहे. या योजनादूतांना दर महिन्याला १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत (Mukhyamantri Yojana Doot) शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. इच्छुक उमेदवारांनी १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

काय आहेत अटी आणि पात्रता? Mukhyamantri Yojana Doot

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा.
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आणि आधार कार्ड लिंक असलेले बँक अकाउंट असावे.

कोणकोणती कागदपत्रे असावी?

आधार कार्ड
पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र
आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा
पासपोर्ट आकाराचा फोटो
हमीपत्र