मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत या महिलांना मिळणार 9 हजार रुपये; अदिती तटकरे यांनी दिली माहिती

Ladaki Bahin Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2024 मध्ये महायुती सरकारने महाराष्ट्रात अनेक नवनवीन योजना अमलात आणल्या. त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये देण्यात आलेले आहेत. नोव्हेंबर पर्यंतचे सगळे हप्ते महिलांच्या खात्याचा जमा झालेले आहेत. त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांमुळे महिलांना पैसे मिळाले नव्हते. परंतु आता पुन्हा एकदा डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला लिंक आहे. त्यांनाच केवळ या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि आता याच योजनेबाबत नवीन आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्ड सिडींग असणे खूप गरजेचे असते. जर तुमचे आधार कार्ड सिडींग नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाही. त्याचप्रमाणे ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात अर्ज केला होता. त्यांचे आधार कार्ड सिडींग नसेल, आता त्यांनी ते लिंक केले असेल, तर त्यांना हे पैसे मिळणार आहेत. याची माहिती देखील आदिती तटकरे यांनी दिलेली आहे

आदित्य तटकरे यांना जून आणि जुलैमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना आधार कार्ड सिडींग नव्हते त्यांना पैसे मिळणार का?असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, “आम्ही सुरुवातीपासून जाहीर केले होते. तेव्हा यामध्ये नमूद केले होते की जुलै आणि ऑगस्ट मध्ये ज्या महिलांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांचे अर्ज मान्य झालेले आहेत. त्यांना त्या दिवसापासून पैसे दिले जाणार आहेत. त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या दिवसापासून लाभ मिळणार आहे. परंतु आधार सिडींगमुळे ज्यांना पैसे मिळाले नाही, त्यांना आता या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत

ऑक्टोबर महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात रजिस्ट्रेशन केलेल्या महिलांना 7500 रुपये जमा झालेले होते. परंतु ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाही. त्यांनी जर रजिस्ट्रेशन केले असेल, तर त्यांना या महिन्यापासून पैसे मिळणार आहे. म्हणजेच त्या महिलांना आता डिसेंबर महिन्यात एकूण 9000 रुपये मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे.

विधानसभा निवडणुकीआधी लाडक्या बहिणींना 2100 रुपये चालू होणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिलेले आहे. परंतु हे पैसे आता मार्च महिन्यानंतर महिलांना देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती देखील अदिती तटकरे यांनी दिलेली आहे.