Mukhymantri Majhi ladki Bahin Yojana | महाराष्ट्र राज्याने नागरिकांसाठी विविध योजना आणलेल्या आहेत. त्याचा फायदा अनेक नागरिकांना झालेला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Mukhymantri Majhi ladki Bahin Yojana) सुरू केली. या योजनेची खूप जास्त चर्चा आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना सरकारमार्फत 15000 रुपये दर महिन्याला दिले जाते. या योजनेमध्ये पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे. जुलैमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे 3 हजार रुपये जमा झालेले आहेत. परंतु अजूनही काही महिलांना हे पैसे मिळालेले नाही. किंवा काही महिला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. याबाबतच महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी अपडेट दिलेली आहे.
आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये अर्ज भरले आहेत. त्यांना सप्टेंबर महिन्यात नक्कीच पैसे दिले जाणार आहे. ज्या महिन्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केला आहे. त्या महिलांना देखील लवकरच पैसे मिळणार आहे. अजूनही लाडकी बहिण योजनेच्या (Mukhymantri Majhi ladki Bahin Yojana) अर्जांची छाननी सुरू आहे.
दोन कोटींपेक्षा जास्त महिला पात्र | Mukhymantri Majhi ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाख अर्ज आलेले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत एक कोटी साठ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत या अर्जांची छाननी सुरू आहे. त्यानंतर या योजनेअंतर्गत दोन कोटींपेक्षा अधिक महिना पात्र ठरतील, असे देखील सांगण्यात आलेले आहे.
या योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख याआधी 31 ऑगस्ट ही होती. परंतु अनेक महिलांना याचा लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे या योजनेच्या कालावधी वाढून 30 सप्टेंबर एवढा करण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, हा सरकारचा खरा उद्देश आहे. त्यामुळे ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेले आहेत. आणि अजूनही त्यांना पैसे आलेले नाहीत. त्यांना तीन महिन्याचे मिळून सगळ्या पैसे सप्टेंबर महिन्यात येणार आहेत. असे देखील त्यांनी सांगितलेले आहे.
त्याचप्रमाणे या संवादात आदिती तटकरे म्हणाल्या की, महिलांची सुरक्षा करणे हा महत्त्वाचा विषय आहे. मात्र महिलांसाठीची योजना हा एक वेगळा भाग आहे. महिलांना सुरक्षितता देणे हा दुसरा भाग आहे. महिला भगिनी सुरक्षित राहावे ही सर्वाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण आणण्याचे कारण नाही. महाराष्ट्राच्या प्रस्तावित शक्ती कायद्याच्या बहुतांश बाबी केंद्र सरकारच्या कायद्यात आहेत. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारकडे वेळोवेळी याची मागणी करत आहोत.