हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मंदीचे वातावरण आहे. 2022 च्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांना शेअर बाजाराने भरपूर नफा दिला. मात्र ही वाढ फार काळ टिकू शकली नाही. यानंतर बाजारात अनेक वेळा घसरण पहायला मिळाली. मात्र इथे हे धन्यात घ्या कि, बाजाराच्या या घसरणीतही काही असे शेअर्स असे आहेत जे गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न देत आहेत. आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत जवळपास 90 शेअर्सनी मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे.
विकास लाइफकेअर स्टॉक हा देखील एक असा मल्टीबॅगर शेअर आहे ज्याने गेल्या एक वर्षापासून आपल्या गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे. आता नोमुरा सिंगापूर लिमिटेड, फोर्ब्स ईएमएफ आणि एजी डायनॅमिक फंड्स लिमिटेड सारख्या मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांचे देखील या शेअर्सकडे लक्ष वेधले गेले आहे. त्यांनी देखील विकास लाइफकेअरचे अनेक शेअर्स खरेदी केले आहेत. Multibagger Stock
किती शेअर्स खरेदी केले ???
एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, फंड रेझिंग मोहिमेअंतर्गत विकास लाइफ केअर कडून एकूण 12,50,00,000 इक्विटी शेअर्स जारी करण्यात आले होते. 25 मे 2022 ते 2 जून 2022 पर्यंत ही ऑफर सुरु करण्यात आली होती. Forbes EMF ने यावेळी 5,40,00,000 इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. तर Nomura Singapore ला 4,40,00,000 इक्विटी शेअर्स देण्यात आले आहेत. त्याच वेळी, AG Dynamic Funds Limited ला 2,70,00,000 इक्विटी शेअर्स देण्यात आले आहेत. या वेळी प्रति शेअर 4 रुपये दराने शेअर्सचे वाटप करण्यात आले. Multibagger Stock
गुंतवणूकदारांना चांगली कमाई झाली आहे
गेल्या वर्षभरात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न दिला आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्सची किंमत 4.60 रुपये प्रति शेअरवरून 5.40 रुपये प्रति शेअर झाली आहे. अशाप्रकारे या शेअर्समध्ये या महिन्यातच 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2022 मध्ये तर या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 25 टक्क्यांची वाढ झाली आहे.
गेल्या 6 महिन्यांमध्ये तर कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 60 टक्के इतका रिटर्न दिला आहे. NSE वर 7 मे रोजी या शेअर्सची क्लोझिंग प्राईस 2.66 रुपये होती, जी आता 5.40 रुपये झाली आहे. अशा प्रकारे या स्टॉकने एका वर्षभरात 101% रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/personal-finance/investment/3-multibagger-stocks-of-2022-with-234-return-so-far-in-2022-1250001.html
हे पण वाचा :
Investment : लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करणे कसे फायदेशीर असते ??? अशा प्रकारे समजून घ्या
Multibagger stock : अवघ्या काही महिन्यांत ‘या’ 5 पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना दिला 2700% रिटर्न !!!
Multibagger Stock : गेल्या सहा महिन्यांत ‘या’ शेअर्समध्ये झाली 645 टक्क्यांची जोरदार वाढ !!!
HDFC चा ग्राहकांना धक्का !!! सात दिवसांत दुसऱ्यांदा कर्जाच्या व्याज दरात वाढ