हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजार पैसे कमावण्याच्या अनेक साधनांपैकी एक आहे. मात्र शेअर बाजारात तोच गुंतवणूकदार यश मिळवू शकतो ज्याच्याकडे संयम आहे. मात्र, त्याबरोबरच योग्य कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणेही महत्वाचे आहे. Rajesh Exports या कंपनीचे शेअर्स हे अलिकडच्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजाराने दिलेल्या मल्टीबॅगर स्टॉकपैकी हा एक आहे. या शेअर्सने दीर्घकालावधीमध्ये भागधारकांना मोठा नफा मिळवून दिला आहे.
कोविड नंतर फेब्रुवारी 2022 पर्यंत Rajesh Exports च्या शेअर्सची किंमत सुमारे 450 रुपयांवरून 994 रुपयांपर्यंत वाढली आहे. या दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीमध्ये आपल्या भागधारकांना 100 टक्क्यांहून जास्त नफा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअर्सने आपल्या भागधारकांना 30 टक्के रिटर्न दिला आहे. मात्र, दीर्घकालीन गुंतवणुकीत हे शेअर्स 2.10 रुपयांवरून 752 रुपयांपर्यंत वाढले आहेत. जवळपास दोन दशकांच्या कालावधीत यामध्ये 358 पटीने वाढ झाली आहे. Multibagger Stock
Rajesh Exports च्या बोनस शेअर्सचा इतिहास
गेल्या 21 वर्षांत या शेअर्सने बोनस शेअर दिले आहेत, ज्याचा दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक केल्याना मोठा फायदा झाला आहे. जानेवारी 2008 मध्ये, Rajesh Exports ने 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले. त्यामुळे, 2001 च्या सुरुवातीला ज्यांनी हा स्टॉक विकत घेतला होता, त्यांच्या शेअर्समधील हिस्सा त्यांनी खरेदी केलेल्या मूळ शेअर्सच्या तिप्पट वाढला. Multibagger Stock
गुंतवणूकदार झाले मालामाल
जर एखाद्याने जुलै 2001 मध्ये या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांचे शेअर्स 2.10 रुपये दराने खरेदी केले असते तर त्याला कंपनीचे अंदाजे 47,619 शेअर्स मिळाले असते. 2008 मध्ये राजेश एक्सपोर्ट्सने 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले होते म्हणजे एखाद्याचे शेअरहोल्डिंग कंपनीच्या 1,42,857 शेअर्समध्ये बदलले. हे लक्षात घ्या कि, Rajesh Exports च्या शेअर्सची आजची किंमत सुमारे 752 रुपये आहे. म्हणजेच, 21 वर्षांपूर्वी जर कोणी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 1 लाख आज 10.74 कोटी रुपये झाले असते. Multibagger Stock
Rajesh Exports बाबत जाणून घ्या
हा मल्टीबॅगर स्टॉक आजकाल एनर्जी स्टोरेज सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करून एडवांस्ड टेक्नोलॉजी सोल्यूशन्समध्ये प्रवेश करण्यासाठी चर्चेत आहे. एडवांस्ड रासायनिक पेशींच्या निर्मितीसाठी 18,100 कोटी रुपयांच्या PLI योजनेतील तीन यशस्वी सहभागींपैकी एक म्हणून भारत सरकारने या कंपनीची निवड केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ओला इलेक्ट्रिक या इतर दोन निवडक कंपन्या आहेत. PLI योजनेच्या आवश्यकतेनुसार, REL ने ACC Energy Storage Pvt Ltd च्या नावाने 100% उपकंपनी समाविष्ट केली आहे. एडवांस्ड रासायनिक पेशी तयार करण्याचा उपक्रम नव्याने स्थापन झालेल्या 100 टक्के उपकंपनी अंतर्गत असेल. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.rajeshindia.com/
हे पण वाचा :
Lava ने लॉन्च केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत अन् फीचर्स तपासा
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???
Multibagger Stock : अवघ्या 17 दिवसांत ‘या’ VFX कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!