हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : जागतिक बाजारात मंदी सदृश वातावरण आहे. ज्याचा परिणाम भारतीय बाजारावरही पाहायला मिळतो आहे. ज्यामुळे शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता आली आहे. यादरम्यान बाजार कधी वर जातो आहे तर कधी अचानक खाली येतो आहे. मात्र या अस्थिरतेच्या वातावरणात असे काही असेही शेअर्स देखील आहेत जे गुंतवणूकदारांना मोठा नफा कमावून देत आहेत. Tanla Platforms हा देखील एक मल्टीबॅगर शेअर्स आहे ज्याने गेल्या पाच वर्षांत 1,4760% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. मात्र, मागील तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये या शेअर्समध्ये 40% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सत्रांमध्ये तो सुमारे 19 टक्क्यांनी घसरून 584.50 वर आलेला आहे.
या आर्थिक वर्षात कंपनीच्या नफ्यात तिमाही आणि वार्षिक आधारावर घट झाली आहे. मार्चच्या तिमाहीच्या ₹140 कोटीच्या तुलनेत Tanla Platform ने 30 जून 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत ₹100 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला. या तिमाहीतील महसूल मागील तिमाही पेक्षा 6.2% कमी झाला आहे. Multibagger Stock
Yes Securities या ब्रोकरेजने फर्मने आपल्या नोटमध्ये म्हटले की, कंपनीची पहिली तिमाही कमकुवत राहिली आहे ज्यामुळे महसूल आणखी खाली येईल. तसेच एबिटा मार्जिनही खाली दिसत आहे. कंपनीच्या अनेक खिशात किंमतीचा दबाव दिसून आला आहे. कंपनी भारतातील CPaaS स्पेसमध्ये आघाडीवर आहे, जी इंडस्ट्रीपेक्षा वेगाने वाढत आहे. Multibagger Stock
त्याच वेळी, सीएनबीसी आवाजच्या तज्ञांचे म्हणणे आहे की, कंपनीचे Google आणि SBI सारखे मोठे ग्राहक कंपनी सोडून गेले आहेत. ज्याचा परिणाम कंपनीवर दिसून येतो आहे. त्यामुळे आता काही काळ वाट पाहणे राहील. मात्र जर कंपनीत पुन्हा अपट्रेंड दिसत असेल तर गुंतवणुकीचा विचार करता येईल. Multibagger Stock
BSE वर 2 ऑगस्ट 2013 रोजी Tanla Platforms चे शेअर्स 2.67 रुपयांवर होते. यानंतर मे 2022 च्या सुरुवातीला हे शेअर्स 1,375 रुपयांवर पोहोचले होते. 9 वर्षांपेक्षा कमी कालावधीत या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 45,000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने 2 ऑगस्ट 2013 रोजी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि त्याने ती तशीच ठेवली असेल तर सध्या त्याला 5.14 कोटी रुपये मिळाले असतील. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.tanla.com/
हे पण वाचा :
Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 40% रिटर्न !!!
Multibagger Stock : एका वर्षात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिला मोठा नफा !!!
Bank Holiday : ऑगस्टमध्ये बँका 17 दिवस राहणार बंद, बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण !!! नवीन भाव तपासा
Part Time Job : दररोज फक्त 1 तास काम करून दरमहा करा हजारो रुपयांची कमाई !!!