हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांपैकी शेअर बाजार देखील एक आहे. याद्वारे गुंतवणुक करून मोठा नफा कमावता येतो. मात्र असे असले तरी त्यामध्ये जोखीमही तेवढीच असते. जर आपल्याला शेअर बाजारात पैसे गुंतवायचे असतील तर त्यासाठी योग्य असे स्टॉक्स शोधायला हवेत. मल्टीबॅगर स्टॉक्स हे असे शेअर्स असतात जे अगदी कमी गुंतवणुकीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट आणि तिप्पट करतात. आज आपण अशाच एका स्टॉकबाबत जाणून घेणार आहोत, ज्याने गेल्या काही वर्षांत 200 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे.
Som Distilleries And Breweries Ltd असे या शेअर्सचे नाव आहे. हे जाणून घ्या कि, सध्याच्या जागतिक मंदी आणि महागाईच्या काळातही या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. या शेअर्सने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट केले आहेत. Multibagger Stock
एका महिन्यात 97 रुपयांवरून 130 रुपयांपर्यंत वाढला
Som Distilleries And Breweries Ltd फक्त या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात सुमारे 97 रुपयांवरून 130 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे, यादरम्यान या शेअर्सची आपल्या भागधारकांना 30 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. तसेच गेल्या सहा महिन्यांबाबत बोलायचे झाल्यास या काळात तो सुमारे 70 रुपयांवरून 130 रुपयांपर्यंत वाढला असून, त्याने 85 टक्के रिटर्न दिला आहे. फक्त 2022 मध्ये यामध्ये 235 टक्क्यांनी वाढ होऊन हा स्टॉक यावर्षी 40 रुपयांवरून 130 रुपयांपर्यंत वाढला आहे. Multibagger Stock
1 लाख 3 लाखांहून अधिक झाले
जर एखाद्याने महिन्याभरापूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 1.30 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे जर एखाद्याने यामध्ये सहा महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची गुंतवणूक 1.85 लाख रुपये झाली असती. त्याचप्रमाणे, जर एखाद्याने 2022 च्या सुरुवातीला यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज 3.35 लाख रुपये झाले असते. Multibagger Stock
Som Distilleries And Breweries Ltd या कंपनीची मार्केट कॅप 902 कोटी आहे. NSE वर त्याचे सध्याचे ट्रेडिंग व्हॉल्यूम आज 5.04 लाख रुपये आहे. तसेच या स्टॉकची सध्याची EPS (प्रति शेअर कमाई) 4 च्या वर आहे. मल्टीबॅगर ब्रुअरीचा स्टॉक 31.66 च्या पीई मल्टिपलवर आहे, जो 71.41 च्या सेक्टर पीईच्या निम्म्यापेक्षा कमी आहे.Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.somindia.com/
हे पण वाचा :
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
IDFC First Bank च्या शेअर्सने एका दिवसात घेतली 10 टक्क्यांनी उसळी
Business : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई !!!