हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock: गेल्या काही वर्षांत शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जर आपणही शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असाल आणि आपण भरपूर रिटर्न देणाऱ्या शेअर्सच्या शोधात असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची ठरेल. कारण आज आपण एका अशा कंपनीच्या शेअर्सबाबत जाणून घेणार आहोत, ज्याने एका वर्षात गुंतवणूकदारांना 100% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे.
आज आपण ज्या कंपनीबाबत चर्चा करणार आहोत तिचे नाव आहे केवल किरण क्लोदिंग लिमिटेड (KKCL) आहे. हे लक्षात घ्या कि, ही कंपनी भारतातील ब्रँडेड कपड्यांची सर्वात मोठी उत्पादक आहे. Kewal Kiran ही कंपनी भारतातील Killer, Easeus, LawmanPG3 आणि Integrity सारख्या अनेक नामांकित ब्रँडसाठी डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंग करते. Multibagger Stock
एका वर्षात गुंतवणूकदार झाले मालामाल
BSE वरील शेवटच्या ट्रेडिंग सत्रापर्यंत या कंपनीचे शेअर्स 0.81 टक्क्यांनी वाढून 499.85 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. गेल्या एका वर्षात या शेअर्सने 105.76 टक्के रिटर्न दिला आहे. 2022 या आर्थिक वर्षांत आतापर्यंत 115.47 टक्के रिटर्न दिला आहे. तसेच, गेल्या सहा महिन्यांत या शेअर्सने 134.74 टक्के आणि गेल्या एका महिन्यात 22.84 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
कंपनीबाबत जाणून घ्या
हे लक्षात घ्या कि, 2022-23 या आर्थिक वर्षासाठी Kewal Kiran च्या संचालक मंडळाने आपल्या भागधारकांना प्रति शेअर 3 रुपये लाभांश जाहीर केला आहे. जो गुंतवणूकदारांना 14 नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध असेल. याशिवाय, कंपनीने वार्षिक 44.82 टक्के वाढीसह 39.13 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. याचबरोबर दुसरीकडे, विक्री वार्षिकरित्या 29.28 टक्क्यांनी वाढून 226.34 कोटी झाली आहे. ज्यामुळे कंपनीची मार्केट कॅप 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/kewal-kiran-clothing-ltd/kkcl/532732/
हे पण वाचा :
Interest Rates : ‘या’ चार बँका बचत खात्यावर देत आहेत सर्वाधिक व्याज, नवीन दर तपासा
PNB ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याज दर तपासा
नवीन बदल अन् फीचर्स सहित पुन्हा लाँच होणार Yamaha RX 100, कंपनीने दिले सूतोवाच
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 4 वर्षांत गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधी रुपयांचा नफा !!!
Train Cancelled : दिवाळीनंतरही रेल्वेकडून 116 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा