Multibagger Stock : ‘या’ पेट्रोकेमिकल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने गेल्या 4 वर्षांत दिला 5500% रिटर्न*

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजारात अनेक शेअर्स हे मल्टीबॅगर म्हणून उदयास आले आहेत. सन्मित इन्फ्राच्या शेअर्सचा देखील यामध्ये समावेश होतो. या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात 150 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अलीकडेच हे शेअर्स 1:10 च्या प्रमाणात स्प्लिट करण्यात आले आहेत. 17 नोव्हेंबर 2022 रोजी हे शेअर्स 85.70 रुपये प्रति शेअर या विक्रमी उच्चांकावर पोहोचले होते. गेल्या एका महिन्यात या शेअर्समध्ये सुमारे 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Sanmit Infra Ltd board approves stock split | EquityBulls

गुंतवणूकदारांना केले मालामाल

गेल्या काही वर्षांत या पेट्रोकेमिकल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना जवळपास 80 टक्के रिटर्न मिळवून दिला आहे. 2022 मध्ये हे शेअर्स सुमारे 29.90 रुपयांच्या पातळीवरून 73.70 रुपये प्रति शेअर झाला आहे. या कालावधीत यामध्ये सुमारे 150 टक्के वाढ झाली आहे. तसेच गेल्या एका वर्षात सुमारे 22.80 रुपयांच्या पातळीवरून 73.70 रुपये प्रति शेअर पर्यंत वाढला आहे. या कालावधीत यामध्ये 225 टक्के रिटर्न मिळाला आहे. Multibagger Stock

Multibagger penny stocks: 2000% bumper return on investment in 1 year, here's how

31 ऑक्टोबर रोजी शेअर्स स्प्लिट झाले

गेल्या चार वर्षांत या कंपनीचे शेअर्स प्रति शेअर 1.31 रुपयांच्या पातळीवरून प्रति शेअर 73.70 रुपयांच्या पातळीपर्यंत वाढला आहे. या कालावधीमध्ये या शेअर्सच्या किंमतीत सुमारे 5500 टक्क्यांची वाढ झाली आहे. Multibagger Stock

Dividend up to ₹10 lakh from shares exempt | Mint

हे लक्षात घ्या कि, 31 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्सचे विभाजन झाले. ज्यानंतर आता गुंतवणूकदारांना एकाच्या प्रमाणात 10 शेअर्स मिळाले. कंपनीने सांगितले होते की, 4 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीच्या शेअर्सच्या विभाजनास मान्यता देण्यात आली होती. कंपनीचा एक शेअर 10 शेअर्समध्ये विभागला गेला त्यानंतर कंपनीच्या एका शेअरचे फेस व्हॅल्यू 10 रुपयांवरून 1 रुपये झाली. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/sanmit-infra-limited/saninfra/532435

हे पण वाचा :
Budget 5G Smartphones : 5G फोनवर स्विच करताय !!! जरा थांबा… 30,000 रुपयांच्या रेंजमधील ‘हे’ उत्कृष्ट स्मार्टफोन्स पहा
फक्त 999 रुपयांमध्ये घरी आणा Samsung Galaxy M33 5G, ‘या’ ऑफर्सविषयी जाणून घ्या
आता घरबसल्या मिळणार Kisan Credit Card रिन्यूअल करण्याची सुविधा, त्यासाठीची पद्धत जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 159 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा