हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर म्हणून उदयास आले आहेत. बाजारातील घसरणीतही या शेअर्सनी मोठा रिटर्न मिळवून दिला आहे. मात्र शेअर बाजारातून नफा मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांकडे संयम असणे आवश्यक आहे. जर आपण योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर नक्कीच चांगला रिटर्न मिळेल. स्टॉक स्मॉलकॅप कंपनी असलेल्या WPIL Limited चे शेअर्स देखील असेच आहे. या शेअर्सने गुंतवणूकदारांना सातत्याने मल्टीबॅगर रिटर्न मिळवून दिला आहे.
गुंतवणूकदार झाले मालामाल
ज्यांनी स्टॉक स्मॉलकॅप कंपनी WPIL Limited मध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते. तो आज करोडपती आहे. 28 फेब्रुवारी 2003 रोजी BSE वर WPIL Limited च्या शेअर्सची किंमत 2.80 रुपयांच्या पातळीवर होती. तसेच आता 15 फेब्रुवारी 2023 रोजी हे शेअर्स 1,690.55 रुपयांच्या पातळीवर बंद झाले आहेत. यादरम्यान गुंतवणूकदारांना तब्बल 60 हजार टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने 2003 मध्ये यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याला आता 6 कोटींहून जास्त रिटर्न मिळाला असता. Multibagger Stock
हे जाणून घ्या कि, चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीत, WPIL Limited चा नफा 80 कोटींच्या वर गेला आहे. जो तब्ब्ल 450 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीच्या झालेल्या मजबूत महसुलामुळे कंपनीच्या नफ्यामध्ये ही वाढ दिसून आली आहे. Multibagger Stock
बाजारातील अस्थिरता
सध्या शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण दिसून येत आहे. यादरम्यान बाजार कधी वर तर कधी खाली येत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे शेअर्समध्ये अद्याप फारशी वाढ झालेली नाही. मात्र, बाजारातील या घसरणी मध्येही असे अनेक शेअर्स आहेत जे ग्रीन मार्कवर दिसत आहेत. या शेअर्समध्ये अजूनही वाढ झालेली पाहायला मिळते आहे. Multibagger Stock
मात्र गुंतवणूकदारांना अजूनही आशा आहे की, आगामी काळात शेअर्समध्ये आणखी वाढ होऊ शकेल. मात्र इथे हे ध्यानात घ्या कि, कोणत्याही आर्थिक सल्लागाराचा सल्ला न घेता शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे धोकादायक ठरू शकेल. असे केल्याने आपल्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. ज्यामुळे कोणत्याही शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याआधी एकदा आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/wpil-ltd/wpil/505872/
हे पण वाचा :
Bank FD : आता ‘या’ बँकेच्या FD वर मिळणार आधीपेक्षा जास्त व्याज, असे असतील नवीन दर
Bank Loan : आता ‘या’ बँकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात केली वाढ, तपासा नवीन व्याजदर
SBI ने सुरू केली नवीन एफडी स्कीम, जाणून घ्या ‘या’ योजनेशी संबंधित खास गोष्टी
Penny Stocks खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान
Pension Scheme : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेद्वारे पती-पत्नी दोघांनाही दरमहा मिळेल 9 हजार रुपयांची पेन्शन