हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारामध्ये अशा काही कंपन्यांचे शेअर्स देखील आहेत जे अल्पावधीतच गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देतात. एजीआय ग्रीनपॅक या कंपनीचे शेअर्स देखील याच श्रेणीत येतात. AGI Greenpac ही पॅकिंग करणारी एक मिडकॅप कंपनी आहे. गेल्या दोन दशकांतच या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या 20 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने 16 हजार टक्क्यांहून जास्त रिटर्न देत गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा नफा मिळवून दिला आहे.
AGI Greenpac ची मार्केट कॅप 2.13 हजार कोटी रुपये आहे, जी इतर कंपन्यांच्या उत्पादनांची पॅकिंग करते. विशेषत: अशा कंपन्यांच्या उत्पादनांचे पॅकिंग करते ज्यामध्ये बाटल्या आवश्यक असतात. यामध्ये अनेक दारू बनवणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. शेअर बाजारात 2002 साली लिस्ट झालेली ही कंपनी आतापर्यंतच्या दमदार कामगिरीमुळे मल्टीबॅगर बनल्याचे दिसून येते. Multibagger Stock
शेअरची किंमत जाणून घ्या
NSE वर 18 ऑक्टोबर रोजी या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1.61 टक्क्यांनी वाढून 330.50 रुपये प्रति शेअर झाली होती. मात्र, 20 वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा या शेअर्सचे ट्रेडिंग सुरू झाले तेव्हा त्याची किंमत 2.02 रुपये प्रति शेअर होती. यादरम्यान यामध्ये 16,261 टक्क्यांनी जबरदस्त वाढ झाल्याचे दिसून येते आहे. जर एखाद्याने 20 वर्षांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे मूल्य 1.63 कोटी रुपये झाले असते. Multibagger Stock
2022 मध्ये आतापर्यंत दिला दीडपट नफा
गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 9.29 टक्क्यांनी घसरण झाली आहे. मात्र, 2022 मध्ये त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे दीड पट केले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये 49 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. तसेच एका वर्षात 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Multibagger Stock
5 वर्षात दिला तीन पट नफा
तसेच गेल्या पाच वर्षांत या कंपनीने 192 टक्के मजबूत रिटर्न दिला आहे. यावेळी शेअर्सची किंमत 113 रुपयांवरून 330.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. जर एखाद्याने 5 वर्षांपूर्वी यामध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची किंमत 2.92 लाख रुपयांवर पोहोचली असती. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/agi-greenpac-ltd/agi/500187/
हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर