हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर मार्केट हे रिटर्न मिळवण्याचे एक चांगले साधन आहे. मात्र त्यामध्ये गुंतवणूक करणे तितकेच धोक्याचे देखील आहे. मात्र, जर योग्य प्रकारे नियोजन करून चांगल्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास थोड्याशा गुंतवणकी द्वारेही आपल्याला कोट्यवधी रुपये मिळवता येतील. शेअर मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत ज्यांनी 10 ते 15 वर्षांच्या कालावधीत छोट्या गुंतवणुकीचे रूपांतर कोटींमध्ये केले आहे. Jyoti Resins & Adhesives चे शेअर्स देखील असेच आहेत. गुजरातच्या या सिंथेटिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने गेल्या 15 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. 15 वर्षांच्या चढ-उतारात कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले गुंतवणूकदार आज करोडपती झाले आहेत.
मार्च 2008 मध्ये 0.89 रुपये किंमत असलेले Jyoti Resins & Adhesives च्या शेअर्सने आता 1100 चा टप्पा ओलांडला आहे. अशा प्रकारे गेल्या 15 वर्षांत या शेअर्सची 1,25,539 टक्क्यांनी झेप घेतली असल्याचे दिसून येते. 2013 मध्ये हे शेअर्स 3.68 रुपयांच्या पातळीवर होते. युरो 7000 या नावाने Jyoti Resins & Adhesives ची उत्पादने बाजारात येतात. Multibagger Stock
गुंतवणूकदार झाले मालामाल
गेल्या पाच वर्षांत या केमिकल कंपनीचे शेअर्स सुमारे 22.55 रुपयांवरून 1,124.60 रुपये प्रति शेअर च्या पातळीवर आले आहेत. यादरम्यान, या कंपनीने 5,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. 2008 मध्ये यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 11 कोटींहून जास्तीचा रिटर्न मिळाला. तसेच येत्या काळात यामध्ये आणखी वाढ होण्याची देखील आशा गुंतवणूकदार बाळगून आहेत. कंपनीकडून नुकतेच 2:1 या प्रमाणात गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देखील जारी करण्यात आले आहेत. ज्यामुळेच गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न मिळाला आहे. Multibagger Stock
कंपनीची कामगिरी
डिसेंबर 2022 ला संपलेल्या नऊ महिन्यांमध्ये Jyoti Resins & Adhesives च्या एकूण विक्रीत 57.58 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तसेच, याच कालावधीत निव्वळ नफा 133.86 टक्क्यांनी वाढून 30.04 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. डिसेंबर 2022 पर्यंत कंपनीमध्ये प्रमोटर्सची 50.82 टक्के आणि लोकांची 49.18 टक्के हिस्सेदारी होती. आर्थिक वर्ष 20 पासून ही कंपनी 50 टक्के आणि 70 टक्क्यांहून जास्त रिटर्न ऑन इक्विटी (ROI) आणि रोजगारावरील भांडवलावर रिटर्न (ROCE) राखत आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/jyoti-resins–adhesives-ltd/jyotires/514448/
हे पण वाचा :
FD Rates : ‘या’ बँकांच्या FD मध्ये गुंतवणूक करून सर्वाधिक व्याज मिळवण्याची शेवटची संधी !!!
Gold Price Today : डॉलरच्या कमजोरीमुळे जागतिक बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, तपासा आजचे नवे भाव
10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 1 रुपयाही Income Tax द्यावा लागणार नाही, जाणून घ्या नियम
Jio च्या ‘या’ प्लॅन अंतर्गत Netflix सबस्क्रिप्शन सहीत मिळवा अनेक फायदे
एका Credit Card चे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरा, फॉलो करा ‘या’ 3 स्टेप्स