हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारामध्ये फक्त तीच लोकं जास्त पैसे कमावू शकतात जे शेअर्स खरेदी करून बराच काळ वाट पाहतात. शेअर बाजाराबाबत असेही म्हटले जाते की, इथे शेअर्सच्या ट्रेडिंग मधून नव्हे तर जास्त काळ वाट पाहण्याने जास्त पैसे मिळतात. अदानी एंटरप्रायझेसने आपल्या गुंतवणूकदारांना वाट पाहण्याचे चांगलेच फळ दिले आहे. गेल्या 20 वर्षात या शेअरने तब्ब्ल 22 हजार टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे.

हे जाणून घ्या कि, गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत हा शेअर्स 9.41 रुपयांवरून 2082.10 रुपयांपर्यंत वाढला आहे. अशा प्रकारे यामध्ये तब्ब्ल 221 पट वाढ झाली आहे. सोमवारी अदानी एंटरप्रायझेसची मार्केट कॅप 2.45 लाख कोटी रुपये होती आणि त्याची ट्रेड व्हॉल्युम 17.64 लाख होती. अदानी एंटरप्रायझेसची करंट बुक व्हॅल्यू प्रति शेअर 228 च्या पातळीपेक्षा थोडी वर आहे. या शेअर्सचा गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक 2,420.95 रुपये आहे तर नीचांक 120.20 रुपये आहे. Multibagger Stock

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वर्षाच्या सुरुवातीला अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सची किंमत 1717 रुपये होती, जी वाढून आता 2082 रुपये झाली आहे. गेल्या एका वर्षात या शेअर्समध्ये 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या सहा महिन्यांत हा शेअर 25 टक्क्यांनी वधारला आहे. इथे हे लक्षात घ्या कि, 5 वर्षांपूर्वी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सची किंमत फक्त 130 रुपये होती. तेव्हापासून आतापर्यंत त्यात सुमारे 1500 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Multibagger Stock
![]()
जर एखाद्याने 2022 च्या सुरुवातीलाच यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला आता 1.21 लाख रुपये मिळतील. जर वर्षभरापूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आता 1.40 लाख रुपये झाले असतील. त्याचप्रमाणे एखाद्याने पाच वर्षांपूर्वी यामध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याला 16 लाख रुपये मिळतील. त्याचप्रमाणे 20 वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक करणारा व्यक्ती आज करोडपती झाला असेल, कारण आता त्याची गुंतवणूक 2.21 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.adanienterprises.com/
हे पण वाचा :
FD Rate : SBI ग्राहकांसाठी चांगली बातमी, बँकेने FD वरील व्याजदर वाढवले
Bank FD : ‘या’ बँकाकडून टॅक्स सेव्हिंग FD वर मिळत आहे सर्वाधिक व्याज !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा
Airtel च्या ‘या’ 2 प्रीपेड प्लॅन्स मध्ये ग्राहकांना मिळतील अनेक फायदे !!!
Jio च्या ‘या’ प्लॅन्समध्ये 3GB डेटासह मिळणार Disney Plus Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन !!!




