Multibagger Stock : ‘या’ सरकारी कंपनीच्या शेअर्सने दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची ही बातमी खूपच उपयुक्त ठरू शकेल. कारण आजच्या या बातमीमध्ये आपण एका अशा शेअर्स बाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्याने मल्टीबॅगर बॅगर रिटर्न मिळवून दिला आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात असे अनेक शेअर्सआहेत ज्यांनी अगदी कमी रकमेतही गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. तर या कंपनीचे नाव आहे Gail India. या कंपनीच्या शेअर्सने देखील काहीसे असेच केले आहे. या कंपनीने दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा नफा मिळवून दिला आहे.

GAIL India Limited Recruitment 2022: Register For 77 Posts at  gailonline.com. Check Last Date Here

या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवलेले 1 लाख रुपयांची व्हॅल्यू आता1.88 कोटी रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे या कंपनीने गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देखील दिले आहेत. 2008 पासून आतापर्यंत कंपनीने आपल्या भागधारकांना 5 वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. ज्यानंतर शेअर्सची एकूण संख्या 182640 झाली असेल. Multibagger Stock

Multibagger penny stocks: 2000% bumper return on investment in 1 year,  here's how

कोट्यवधी रुपयांचा नफा

BSE वर 26 मे 2000 रोजी Gail India च्या शेअर्सची किंमत 4.38 रुपये होती. आज या शेअर्सची किंमत 103.50 रुपयांच्या पातळीवर आहे. जर एखाद्याने त्यावेळी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याच्याकडे आता 1.88 कोटी रुपये झाले असतील. Multibagger Stock

3 Multibagger Small-Cap Stocks That Tripled Investor's Wealth; Are you  holding any? - Trade Brains

8 महिन्यांच्या उच्चांकावर

हे जाणून घ्या कि, 24 फेब्रुवारी 2023 रोजी इंट्राडेमध्ये GAIL India च्या शेअर्सची 5 टक्क्यांहून जास्तीच्या मजबूत रॅलीसहीत 103.35 रुपयांची पातळी गाठली. जी या कंपनीची गेल्या 8 महिन्यांची सर्वोच्च पातळी आहे. याआधी19 एप्रिल 2022 रोजी या शेअर्सने 116 रुपयांच्या पातळीसहीत गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. गेल्या 6 महिन्यांत हे शेअर्स सुमारे 17 टक्के तर गेल्या एका वर्षात 19 टक्क्यांनी वाढले आहेत. Multibagger Stock

GAIL Start-up

कंपनी बाबत जाणून घ्या

GAIL India ही गॅस युटिलिटी कंपनी आहे जी गॅस ट्रान्समिशन आणि ट्रेडिंग, लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG), LLC आणि पेट्रोकेमिकल्स यासारख्या विविध विभागांमध्ये गुंतलेली आहे. कंपनी FY22 च्या शेवटी 14,500 किमीचे नैसर्गिक वायू पाइपलाइन नेटवर्क चालवते. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/gail-(india)-ltd/gail/532155/

हे पण वाचा :
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 13 व्या हप्त्याचे पैसे ‘या’ तारखेला जमा होणार 
Bank FD : आता ‘या’ बँकेच्या FD वर मिळणार आधीपेक्षा जास्त व्याज, असे असतील नवीन दर
Poco C55 : 10 हजारांपेक्षा कमी किंमतीमध्ये मजबूत फीचर्स असलेला ‘हा’ फोन भारतात लाँच
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 2411% रिटर्न
Bank Holiday : मार्चमध्ये 12 दिवस बँका राहणार बंद, घर सोडण्यापूर्वी तपासा सुट्ट्यांची लिस्ट