हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : जागतिक बाजारात सध्या आर्थिक मंदीचे वातावरण आहे. ज्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून येतो आहे. गेले काही दिवस शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ उतार दिसून येत आहेत. मात्र या गोंधळाच्या पार्श्वभूमीवरदेखील काही शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत. आजच्या ट्रेडिंगमध्ये बायोटेक्नोलॉजी कंपनी असलेल्या Panacea Biotech च्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाल्याचे दिसून आले. युनिसेफ आणि पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशनकडून मोठ्या कालावधीसाठी लसीचा पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाल्यामुळे हे घडत असल्याचे कंपनीकडून यावेळी सांगण्यात आले आहे. ज्यानंतर मंगळवार, 11 ऑक्टोबर रोजी हे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढून 160 रुपयांच्या पातळीवर पोहोचले.
एक्सचेंज फाइलिंगमध्ये कंपनीकडून सांगण्यात आले की,” त्यांना सुमारे 1,040 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. या एकूण ऑर्डर्सपैकी युनिसेफची ऑर्डर 813 कोटी रुपयांची आहे तर उर्वरित ऑर्डर PAHO कडून मिळाली आहे. कंपनीला मिळालेल्या ऑर्डरनुसार, Panacea Biotech कडून 2023-2027 दरम्यान WHO प्री-क्वालीफाइड पूर्णपणे द्रव रूपातील पेंटावॅलेंट लसीचे सुमारे 10 कोटी डोस युनिसेफला पुरवले जातील. याशिवाय, 2023-2025 दरम्यान, PAHO ला सुमारे 2.5 कोटी डोस पुरवले जातील. Multibagger Stock
2005 मध्ये भारतात पहिल्यांदा लाँच करण्यात आली ही लस
हे लक्षात घ्या कि, Easyfive-n ही पूर्णपणे द्रव स्वरूपात असलेली जगातील पहिलीच WP-बेस्ड पेंटाव्हॅलेंट लस आहे. जी 2005 मध्ये भारतात पहिल्यांदा लाँच करण्यात आली होती. 2008 मध्ये WHO कडून प्रीक्वालिफिकेशन मिळाल्यापासून या लसीचे 15 कोटींहून जास्त डोस जागतिक स्तरावरील 75 पेक्षा जास्त देशांना पुरवण्यात आले आहेत. Multibagger Stock
कंपनीबाबत जाणून घ्या
Panacea Biotec लस, मधुमेह, ट्रांसप्लांट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि ऑन्कोलॉजीसाठी औषधे बनवते. त्याने 2017 मध्ये जगातील पहिली पूर्णपणे द्रवरूप हेक्साव्हॅलेंट लस EasySix लाँच केली. या कंपनीकडून डेंग्यू वरील लस आणि न्यूमोकोकल कंजुगेट लस देखील विकसित केली जात आहे. Multibagger Stock
कंपनीच्या शेअर्समध्ये झाली 18 टक्क्यांनी वाढ
Panacea Biotech कंपनीच्या शेअर्स बाबत बोलायचे झाल्यास, त्याचे शेअर्स सध्या बेंचमार्क निफ्टी निर्देशांकापेक्षा 18 टक्क्यांनी वाढून 158 रुपयांवर ट्रेड करत आहेत. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.panaceabiotec.com/
हे पण वाचा :
गेल्या एका महिन्यात ‘या’ Multibagger Stock ने दिला 251% रिटर्न !!!
Union Bank of India कडून ग्राहकांना धक्का !!! MCLR आधारित कर्ज दरात केला बदल
Oral Health Foundation च्या माध्यमातून 300 रुग्णांची मोफत दंत तपासणी ; भानुशाली परिवाराचा स्तुत्य उपक्रम
Train Cancelled : रेल्वेकडून 128 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सणासुदीच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण, नवीन दर पहा