हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : काही दिवसांपूर्वीच फँटम डिजिटल इफेक्ट्स लिमिटेडचा IPO लाँच करण्यात आला होता. यावेळी शेअर्स मिळालेल्या गुंतवणूकदार चांगलेच मालामाल झाले आहेत. 21 ऑक्टोबर रोजी SME प्लॅटफॉर्मवर लिस्टेड झालेल्या Phantom Digital Effects Share ने गुंतवणूकदारांना अवघ्या 17 दिवसांत मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. या IPO मध्ये गुंतवणूकदारांनी खुलेपणाने पैसे गुंतवले होते. आता कंपनीच्या शेअर्सवरही गुंतवणूकदारांच्या पैशांचा पाऊस पडत आहे.
हा स्टॉक 21 ऑक्टोबर 2022 रोजी SME प्लॅटफॉर्मवर लिस्टेड झाला होता. त्याचा प्राईस बँड प्रति इक्विटी शेअर 91-95 रुपये निश्चित करण्यात आला होता. सोमवार, 7 नोव्हेंबर रोजी तो 258 रुपयांवर बंद झाला. अशाप्रकारे 17 दिवसांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 171 टक्के रिटर्न दिला आहे. या कंपनीचे शेअर्स SME प्लॅटफॉर्मवर 300 रुपयांवर लिस्टेड झाले आणि गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नफा मिळाला. Multibagger Stock
लिस्टींगच्या दिवशीच गुंतवणूकदार झाले मालामाल
हा एसएमई स्टॉक 300 रुपये प्रति शेअरवर सूचीबद्ध झाला आणि पहिल्या दिवशी 312.70 रुपयांवर बंद झाला. लिस्टींगच्या दिवशी इंट्राडेमध्ये हे शेअर्स 315 रुपयांपर्यंत पोहोचला. अशा प्रकारे, लिस्टिंगच्या दिवशीच या शेअर्सने गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांहून जास्तीचा रिटर्न मिळवून दिला. जर एखाद्या गुंतवणूकदाराला या IPO मध्ये 95 रुपयांच्या अप्पर प्राइस बँडनुसार शेअर्सचे वाटप झाले असेल आणि त्याने या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असेल तर आता त्याची रक्कम 17 दिवसांत सुमारे 2.72 लाख रुपये झाली आहे. Multibagger Stock
IPO ला मिळाला मोठा प्रतिसाद
Phantom Digital Effects चा IPO गेल्या महिन्यात 12 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान उघडला गेला. 29.10 कोटी रुपयांचा इश्यू 164 पट सबस्क्राइब झाला. नॉन- इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्ससाठी राखीव असलेला हा इश्यू 555 पट सब्सक्राइब झाला. रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला इश्यू 207 पट आणि क्वालीफाईड इंस्टीट्यूशनल बॉयर्सचा इश्यू (QIBs) 15 पट सब्सक्राइब झाला. या शेअर्सची 1200 लॉट साइज निश्चित करण्यात आली होती. Multibagger Stock
कंपनीबाबत जाणून घ्या
Phantom Digital Effects ही सर्टिफाइड ट्रस्टेड पार्टनर नेटवर्क (TPN) कंपनी आहे. कंपनी VFX शी संबंधित सर्व्हिस पुरवते. चित्रपटांमध्ये VFX चा वापर केला जातो. त्याच्या मदतीने, चित्रपटांचे दृश्य भव्य आणि वास्तविक बनवले जातात. कॅनडा आणि अमेरिकेत ऑफिस असलेल्या या कंपनीचा भारतात क्रिएटिव्ह VFX स्टुडिओ आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.phantom-fx.com/
हे पण वाचा :
HDFC Bank ने ग्राहकांना दिला धक्का !!! आता EMI साठी मोजावे लागणार जास्त पैसे
Redmi Clearance Sale : फक्त 4,499 रुपयांमध्ये घरी आणा Redmi चा ‘हा’ पॉवरफुल फोन
Multibagger Stock : सॉक्स बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 3 पट नफा !!!
Bandhan Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!!! FD वर मिळणार 8% पर्यंत व्याज
Aadhar Card मधील माहिती अपडेट करण्यासाठी किती खर्च येतो हे जाणून घ्या