हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या स्थापन करण्यात आलेले आहे. यावेळी ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर देखील झपाट्याने वाढताना दिसत आहेत. आता या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा भारतामध्ये जास्त विस्तार झाल्याने त्या भारतातील तरुणांना भरपूर नोकऱ्या उपलब्ध असल्याची माहिती समोर आलेली आहे. 2023 पर्यत जगभरातील 500 आंतरराष्ट्रीय कंपन्यांपैकी जवळपास 70 टक्के कंपन्या या भारतात विस्तार करतील असे सांगण्यात आलेले आहे. सध्या भारताचे वजन आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत आहे. त्याचप्रमाणे भारताचा आर्थिक विकास देखील खूप वेगाने चालू आहे. तसेच भारतामध्ये एआय एक्सलन्स सेंटर उभे राहिलेले आहेत. या सगळ्याचा विचार करता आणि भविष्यातील फायद्याचा विचार करता जवळपास 70 टक्के कंपन्या या भारतात विस्तार करणार आहेत. या कंपन्या भारतातील तरुणांना आता रोजगार निर्मिती खूप तयार होणार आहे. आपल्या भारताला सुशिक्षित बेरोजगारीने ग्रासले आहे. परंतु या आंतरराष्ट्रीय कंपन्या जर भारतात स्थायिक झाल्या, तर आपल्या देशातील सुशिक्षित बेरोजगारांना खूप चांगल्या नोकरीची संधी मिळेल.
रोजगार वाढणार
- जीसीसीचा जर विस्तार झाला, तर पुढील काही वर्षांमध्येच भारतात एक खूप मोठी रोजगार निर्मिती होणार आहे.
- जीसीसीमध्ये सध्या 19 लाख कर्मचारी संख्या आहेत. परंतु भविष्यात जाऊन ही संख्या 25 ते 28 लाख कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच भारतातील इतक्या जास्त तरुणांना या ठिकाणी नोकरी लागण्याची संधी आहे.
वेतनही वाढणार
सध्या आपण जीसीसीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर्सला पाहिले तर त्यांना दर वर्षाला जवळपास 9 लाख ते 43 लाख रुपये एवढे वेतन मिळते. तर यातून भारतातील आयटी कंपन्यांमध्ये हेच वार्षिक वेतन कर्मचाऱ्यांना 6 ते 18 लाख रुपये एवढे मिळते. परंतु या जीसीसीचा विस्तार जर देशांमध्ये झाला, तर तरुणांना खूप चांगला रोजगार देखील मिळणार आहे. म्हणजेच त्यांचे ज्ञान आणि कौशल्याच्या आधारावर त्यांना मोबदला मिळणार आहे.