Mumbai Ac Local : एसी लोकलमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना बसणार चाप ; जारी केला विशेष हेल्पलाईन नंबर

AC local
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Ac Local : मुंबईमध्ये रेल्वेला किती गर्दी असते हे काही वेगळं सांगायला नको. विशेषतः लोकल ह्या खचाखच गर्दीने भरलेल्या असतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे एसी लोकलला प्रवास करणाऱ्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र अनेकदा एसी लोकलमधून फुकट्यांचा प्रवास होत असल्याची माहिती समोर आली आहे. एसी लोकल मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मुळे (Mumbai Ac Local) तिकीट काढून बसणाऱ्या प्रवाशांची मात्र गोची झाली आहे.

म्हणूनच रेल्वेच्या टास्क फोर्सकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एसी लोकल आणि साध्या लोकलच्या फर्स्ट क्लास ने प्रवास करताना विना तिकीट किंवा साधे तिकीट असतानाही घुसकोरी करून गर्दी करणाऱ्या प्रवाशांना (Mumbai Ac Local) धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तपासणी करण्याबरोबरच मध्य रेल्वेच्या टास्क फोर्स न एक नवीन व्हाट्सअप क्रमांक जारी केला आहे. या हेल्पलाइनवर जर प्रवाशांना प्रवासामध्ये काही अनधिकृत व्यक्ती प्रवास करत असल्याचा आढळल्यास त्यावर तुम्ही तक्रार करू शकता.

रोज 33 लाख प्रवासी करतात प्रवास (Mumbai Ac Local)

खरंतर मध्य रेल्वे मध्ये तर रोज 33 लाख प्रवासी प्रवास करतात तसं दररोज 810 लोकल फेऱ्या चालवल्या जातात. मध्य रेल्वेवर दररोज एसी लोकलच्या 66 फेऱ्या चालवल्या जातायेत. एसी लोकलच्या मागणीतही वाढ होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसी लोकलचे एकेरी प्रवासाचे तिकीट मागच्या वर्षी निम्म्या किमतीने कमी केले होते. त्यामुळे मध्या रेल्वेच्या 66 एसी लोकल फेऱ्यांमधून दररोज साधारण 78 हजार 332 प्रवासी प्रवास करतात. ऐसी लोकलला प्रवासी प्राधान्य देत आहेत.

सर्वाधिक एसी लोकलच्या फेऱ्या ह्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गावर (Mumbai Ac Local) चालवण्यात येत आहेत अशावेळी एसी लोकल मधून सुरक्षित प्रवास करता येत आहे मात्र एसी लोकल मधून काही विना तिकीट प्रवासी घुसखोरी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या त्यामुळे मध्य रेल्वेच्या एसी टास्क फोर्स नियमित तिकीट तपासणी सोबतच एक हेल्पलाइन जारी केला आहे.

काय आहे हेल्पलाईन नंबर ? (Mumbai Ac Local)

तुम्ही सुद्धा एसी लोकलने प्रवास करत असाल आणि तुम्हाला जरी कोणतेही प्रवासी विना तिकेट किंवा साध्या लोकांचे तिकीट घेऊन एसी लोकलमध्ये प्रवास करताना आढळले तर अशावेळी तुम्ही एका व्हाट्सअप नंबरला मेसेज करू शकता आणि तुमची तक्रार नोंदवू शकता. 7208819987 असा हा हेल्पलाइन नंबर आहे. या हेल्पलाइन नंबर वर केवळ मेसेज करण्याची सोय आहे.

प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मध्य रेल्वेची एक स्पेशल मॉनिटरिंग टीम स्थापन करण्यात आली असून या क्रमांकावर तक्रार येताच ही टीम कारवाई करणार आहे. शिवाय तक्रारीचे निवारण केलं नाही तर ही टीम दुसऱ्या दिवशी (Mumbai Ac Local) त्या डब्यामध्ये साध्या पेक्षा जाणार आहे आणि कारवाई करणार आहे असं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी एका माध्यमाला माहिती देताना स्पष्ट केले आहे.