१९९८ पासून बंद पडलेली मुंबई-औरंगाबाद- उदयपूर विमानसेवा पुन्हा सुरु होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । १९९८ पासून बंद पडलेली एअर इंडियाची मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा १६ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. औरंगाबाद ते उदयपूरचे कमीतकमी ३ हजार ५९७ तर जास्तीत जास्त ७ हजार २८१ प्रवास भाडे राहण्यची शक्यता आहे.

विमान मुंबईहून सकाळी साडेसहा वाजता चिकलठाणा विमानतळावर येईल. नंतर ७.१५ दरम्यान उदयपूरच्या दिशेने झेपावेल. सकाळी ८.४० वाजता उदयपूरला पोहोचेल. नंतर पुन्हा ९.३५ वाजता औरंगाबादकडे झेपावेल. ११ वाजता शहरात येईल. येथून पुन्हा १२.१५ वाजता मुंबईला जाईल. दुपारी १.३५ वाजता मुंबईत लॅण्ड होईल. आठवड्यातून तीन दिवस बुधवार, शुक्रवार आणि रविवार ही उड्डाणे असणार आहेत. त्यामुळे औरंगाबाद-मुंबईसाठी आणखी एक विमान वाढवलय.

२१ वर्षानंतर औरंगाबाद शहर हे उदयपूरला विमानसेवेने जोडले जाणार आहे. १६ ऑक्टोंबरपासून एअर इंडियाचे विमान आठवड्यातून तीन दिवस उदयपूरकड उड्डाण घेईल. याशिवाय नांदेड औरंगाबाद रेल्वे सुरू करण्याचा निर्णय रेल्वे विभागान घेतला आहे. हे विमान सुरू व्हावे यासाठी औरंगाबाद टुरिझम डेव्हलमेंट फोरमचे सुनीत कोठारी आणि जसवंत सिंग यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यांना इंडियन टुरिस्ट असोसीएशनच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. खासदार इम्तियाज जलील यांनीही यासंदर्भात लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

Leave a Comment