Mumbai BEST : जवळपास सर्वच क्षेत्रात महागाई वाढली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इंधनाची दर वाढ झाले आहे. आता वाढत्या महागाईचा परिणाम मुंबईतील ‘बेस्ट’ वर झाला असून बेस्ट (Mumbai BEST) मधून नियमित प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण बेस्टच्या भाड्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ आज दिनांक १ मार्चपासूनच लागू करण्यात येत आहे. चला या संदर्भात जाणून घेऊया महत्वाची माहिती.
किती रुपयांची वाढ ?
(Mumbai BEST) बेस्टच्या मासिक पासमध्ये 150 रुपयांची वाढ केली गेली आहे. एका महिन्याच्या पाससाठी आधी 750 रुपये द्यावे लागायचे त्याऐवजी आता आजपासून 900 रुपये द्यावे लागणार आहेत. तर दैनिक पास साठी पन्नास रुपये द्यावे लागायचे मात्र आता 60 रुपये द्यावे लागणार आहेत.दररोज बेस्ट मधून 35 लाख प्रवासी प्रवास करतात. तर पास काढून प्रवास करणाऱ्या बेस्ट (Mumbai BESTप्रवाशांची संख्या दहा लाख 40 हजार इतकी आहे.
काय आहे BEST चे म्हणणे ?
याबाबतीत बेस्ट ने सांगितलं की दैनंदिन आणि मासिक पासनुसार अमर्याद प्रवास आणि एसी बस मधून प्रवासाची सुविधा कायम आहे. नव्या सुधारित दरानुसार 42 ऐवजी 18 बस पास करण्यात आले आहेत. बस पास सहा रुपये 13 रुपये, 19 रुपये 25 रुपयांपर्यंतच्या वातानुकूलित आणि विना वातानुकूलित प्रवास भाड्याच्या अनुषंगाने साप्ताहिक आणि मासिक स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहेत. तसंच शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोनशे रुपयांचा मासिक बस पास उपलब्ध आहे आणि बस पासच्या सहाय्याने अमर्याद बस फेऱ्यांची सुविधा सुद्धा कायम ठेवण्यात आली आहे.
नव्या योजनेनुसार महत्वाचे बदल (Mumbai BEST)
- ज्येष्ठ नागरिकांना मासिक बस पास मध्ये पन्नास रुपये सवलत कायम ठेवण्यात आलेली आहे.
- पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गणवेशधारक विद्यार्थ्यांना तसेच 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग प्रवाशांच्या मोफत प्रवासाच्या बस पास मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
- बेस्ट उपक्रमाचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या 900 रुपये आणि अधिस्वीकृती धारक पत्रकारासाठी असलेल्या वार्षिक 365 रुपयांच्या बस पाच दरामध्ये कोणताही बदल नाही.
- साप्ताहिक पासनुसार सहा रुपयांपर्यंतच्या फेरी करता 70 रुपये, 13 रुपयांपर्यंतच्या बस फेरीसाठी 175 रुपये, 19 रुपयांपर्यंतच्या 265 आणि 25 पर्यंतच्या फेऱ्यांसाठी 350 रुपये तिकीट दर लागू असेल.