काँग्रेसने केला मुंबईचा जाहीरनामा प्रसिद्ध; महिलांना दिली ही वचने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार चालू झालेला आहे. तसेच अनेक पक्षांनी त्यांचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला आहे. अशातच आता मुंबई काँग्रेसने निवडणूकीसाठी त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. या जाहीरनामांमध्ये त्यांनी मुंबईकरांसाठी अनेक वचने देखील दिलेली आहे. परंतु त्यांच्या या जाहीरनामावर मोठ्या टीका देखील होऊ लागलेल्या आहेत. काँग्रेसच्या या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी महिलांसाठी अनेक वचने दिलेली आहेत. तसेच बेरोजगारी विरोधात अनेक उपाय योजना तसेच मच्छीमार समाजाच्या कल्याणासाठी अनेक योजना देखील आणलेल्या आहेत. परंतु त्यांनी या जाहीरनामात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावल्याने काँग्रेस पक्षावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या या जाहीरनामात सोनिया गांधींचा फोटो नाही असे करण्यामागे नक्की काय कारण आहे? असा प्रश्न देखील विरोधकांकडून केला जात आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पत्रिका परिषद घेतली. आणि महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर त्यांनी मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्र देशातील आर्थिक केंद्र आहे. परंतु दिवसेंदिवस या स्थितीत घसरल होत चालल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. यावेळी चिदंबरम म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य होते. इंडस्ट्री, सेवा, क्षेत्र आणि शेती क्षेत्रात अनेक भूमिका बजावलेले आहेत. परंतु आता शेती क्षेत्रात अत्यंत बिकट परिस्थितीला सामना देत आहे. शेतीच्या मालाचे दर घसरलेले आहेत. आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती होत नाही त्यामुळे या क्षेत्रात घसरून दिसत आहे.

यावेळी चिदंबरम यांनी अनेक कर्ज घेण्याच्या धोरणावर हे मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे. आणि राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. ते म्हणाले की, “पैसे वापरले जात आहेत पण विकास कुठे आहे? कोणत्याही प्रकारचा विकास अजून झालेला दिसत नाही. तसेच बेरोजगारीच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे. 18300 पोलीस भरतीसाठी 11 लाख उमेदवारांनी अर्ज केलेला आहे. तसेच तलाठी भरती ही 4600 पदांसाठी जवळपास 11.5 लाख उमेदवारांनी अर्ज केलेले आहे. यावरूनच महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती किती बिकट आहे हे समोर आलेले आहे.”

या जाहीरनाम्यामध्ये वर्षा गायकवाड यांनी देखील मुंबईकरांसाठी अनेक योजनांची घोषणा केलेल्या आहे. या जाहीरनाम्यात त्या म्हणाल्या की, आम्ही मुंबईचा मुंबईनामा देत आहोत. या योजनांमध्ये महिलांसाठी 3000 रुपये मासिक सहाय्य तसेच महिलांना वन्स स्टॉप प्राइस इन सेंटर वस्तीगृहांची उभारणी आणि बेरोजगार तरुणांसाठी महिन्यात 4 हजार रुपये देण्याचे आश्वासन देत आहोत. त्याचप्रमाणे त्यांनी मच्छीमार समुदायासाठी पाच लाख रुपयांची कर्जमाफी तसेच 25 लाख रुपये आरोग्य विमा आणि मोफत औषधे देण्याचा वादा देखील केलेला आहे. त्याचप्रमाणे वर्षाच्या शिकाउ उमेदवारांसाठी शिक्षित तरुणांना संधी देणे, धारावी प्रकल्प रद्द करणे आणि आरक्षण मर्यादा 50% निवडून हटवण्याचा निर्णय देखील जाहीर केलेला आहे.