मुंबई । दिल्लीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव दिसत आहे. दिल्लीतील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता खबरदारी म्हणून मुंबई-दिल्लीमधील हवाई आणि रेल्वे वाहतूक बंद ठेवण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार याबाबतचा निर्णय येत्या एक-दोन दिवसांत घेतला जाऊ शकतो.
राजधानी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे दिल्लीत काही निर्बंध लादले आहेत. त्यामुळे दिल्लीतील परिस्थिती लक्षात घेता मुंबईतही काळजी बाळगली जात आहे.
मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-मुंबई हवाई त्यासोबत रेल्वे प्रवास बंद करण्यासाठीचा पत्र व्यवहार संबंधित विभागांना केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं दिल्लीतील परिस्थिती गंभीर बनल्यास कोरोनाच्या संक्रमणापासून मुंबईला दूर ठेवण्यासाठी मुंबई-दिल्ली प्रवास सेवा बंद करावी लागेल.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in