मुंबई | नवी मुंबईतील तळोजा भागात एका कंपनीवर छापे टाकल्या नंतर त्या ठिकाणी केटा माईन नावाचे ड्रग्स सापडले आहे. त्याची किंमत ५० कोटीं रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. तळोजा भागात एका कंपनी सारख्या दिसणाऱ्या इमारतीत हे ड्रग्स बनवायाचे काम सुरू होते. या प्रकरणात प्रत्यक्ष छाप्यात १० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबई मधील हा ड्रग्सचा व्यवसाय जगभर व्यापलेला असल्याचा अंदाज तपासातील पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तळोजा भागात काही अज्ञात लोकांच्या विशिष्ठ हालचाली सुरू असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. साध्या वेशातील पोलिसांनी गस्त घालून सदर प्रकारचा ठोकटाळा घेतला आणि अचानक छापा टाकला. त्यावेळी ५० कोटींचे ड्रग्स जप्त केले आहेत. पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या –
धक्कादायक, विद्यार्थीनीवर मुख्याध्यापक, शिक्षकांनीच केला बलात्कार
ठाण्यात भरदिवसा तरुणीची धारधार चाकूने हत्या