Mumbai Expresways : मुंबईच्या विकासासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यातही मुंबईकरांचा प्रवास हा जलद आणि ट्रॅफिकमुक्त व्हावा या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. आता यात आणखी एका प्रकल्पाची भर पडणार आहे. एम एम आर क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर अशी सर्व शहर महामार्गासोबत थेट जोडण्यात यावी यासाठी नव्या महामार्गाची योजना आखण्यात आली असून याला ” नवी मुंबई NH-3 व्हाया कल्याण बदलापूर प्रवेश नियंत्रण ” ( एक्सेस कंट्रोल ) (Mumbai Expresways) असे नाव देण्यात आले आहे
मिळालेल्या माहितीनुसार या रस्त्याच्या उभारणीबाबत एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली यावेळी टाटा कन्सल्टिंग इंजिनियर कंपनीने सुचवलेल्या अनेक पर्यायावर तज्ञांशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी संवाद साधला. तर टाटामार्फत यावेळी बदलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा रूट एक्सेस कंट्रोल मार्गासाठी चांगला पर्याय असल्याचं (Mumbai Expresways) निश्चित करण्यात आला आहे.
कसा असेल हा मार्ग ?
बदलापूर इथून जात असलेल्या मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्गाच्या इथून या रस्त्याची सुरुवात होणार आहे. याच मार्गावरन पुढे जात पालेगाव इथे मार्गाला पहिला इंटरचेंज मिळणार आहे. याद्वारे नागरिकांना अंबरनाथ शहरात तसेच काटई बदलापूर मार्गावर जाता येणार आहे. त्याच्यापुढे हा मार्ग कल्याण पूर्वेतून जात (Mumbai Expresways) असून मार्गावर हेदुटणे इथं मार्गाला दुसरा इंटरचेंज देण्यात येणार आहे. या मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा हा इंटरचेंज असून इथून वाहन चालकांना मेट्रो बाराच्या हेडूटनेस्थानकात जाता येणार आहे. याशिवाय कल्याण रिंग रोडची कनेक्टिव्हिटी या मार्गावरून असणार आहे. कल्याण शेळफाटा मार्गावर देखील इथून जाता येणार आहे.
मुंबई- पुणे एक्सप्रेसवेला जाता येणार
याच्यापुढे शिरडून इथं या रस्त्यावरून मल्टी मोड कॉरिडॉर मार्गाला जाता येणाऱ्या या मल्टीमोड कॉरिडोर उभारण्याचं काम देखील जलद गतीने सुरू आहे. या कॉरिडोर मुळे थेट पुढे मुंबई- पुणे एक्सप्रेस वे ला जाता येणार आहे. शिवाय हाच मार्ग सीएसटी कोस्टल रोडलाही जोडला जाणार असून याद्वारे थेट नवी मुंबई (Mumbai Expresways) आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठायला सोपं होणार आहे.
पनवेलला जाणं सोपं होणार
आता तिसरा इंटरचेंज असणार आहे तो शिरढोण इथे असणार असून कल्याण इथली 27 गाव इथं जोडली जाणार आहेत. तर ऊसाटणे इथून जाणाऱ्या राज्य महामार्गाला याची कनेक्टिव्हिटी असणार आहे. कामाच्या स्टेटस बद्दल बोलायचं झालं तर उसाटणे येथील रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून पुढे मुंबई पनवेल हायवे (Mumbai Expresways) ला या मार्गाची जोडणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पनवेलला जाणं सोपं होणार आहे.
त्याच्यापुढे हा मार्ग खारघर तुर्भे लिंक रोडला थेट जोडण्यात येणार असून या लिंक रोडची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रत्येक उभारणीचे काम देखील लवकर सुरू होणार आहे. या लिंक रोड द्वारे नवीन मुंबई थेट जाता येणार (Mumbai Expresways) आहे तसेच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे जात येणार आहे.
समृद्धी महामार्गलाही जोडणार
मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर इथून मुंबई बडोदा राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार असून याद्वारे नागरिकांना समृद्धी महामार्गाला जाता येणार आहे. त्यामुळे मुंबई ते डायरेक्ट नागपूर रस्त्याला हा मार्ग जोडला जाणार आहे. तर समृद्धी महामार्गाद्वारे पुढे मुंबई आग्रा हायवे इथे थेट जाता येणार आहे. त्यामुळे नाशिकच्या दिशेने सुद्धा प्रवास या महामार्गावरून (Mumbai Expresways) करता येणार आहे.