मोठी दुर्घटना ! मुंबईच्या काळबादेवी परिसरात इमारत कोसळली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असताना राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात एक अनपेक्षित घटना घडली आहे. मुंबईच्या काळबादेवीत इमारत कोसळून (building collapse) मोठी दुर्घटना घडली आहे. हि संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सर्वसामान्यपणे रस्त्यावर वर्दळ असताना हि इमारत कोसळते (building collapse). या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या दुर्घटनेत (building collapse) किती नुकसान झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेत जीवितहानी झालीय का याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. काळबादेवीत जी इमारत कोसळली ती चार मजली इमारत होती. मुंबईत कालपासून पावसाने जोर धरला आहे. त्यानंतर आता इमारत कोसळण्याच्या (building collapse) घटना घडू लागल्या आहेत. मुंबईच्या कुर्ला परिसरात काल नुकतीच इमारतीचा एक भाग कोसळल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता काळबादेवी परिसरात चार मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेमध्ये (building collapse) किती नागरीक जखमी झाले आहेत याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. अग्निशमन दल आणि प्रशासनाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून ढिगारा उचलण्याचं काम सुरु करण्यात आले आहे. हि इमारत धोकादायक असल्याचे याअगोदरच प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

हे पण वाचा :
सोन्यामध्ये घसरण झाल्यामुळे Gold Loan वर काय परिणाम होतो ???

चांदोबाचा लिंबमध्ये माऊलीच्या अश्वांचे पहिले उभे रिंगण उत्साहात

मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेची घोषणा होताच गोव्यात शिवसेना आमदारांचा जल्लोष

अजून एका सातारकराची मुख्यमंत्रीपदी वर्णी; शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना दिल्या खास शुभेच्छा

शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंचे अभिनंदन; व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा

Leave a Comment