Mumbai – Goa Expressway | हॅलो महाराष्ट्र गेल्या पंधरा वर्षापासून मुंबई-गोवा महामार्ग बनवण्याचे काम रखडलेले आहे. त्यामुळे आता हे काम कधी पूर्ण होणार आहे. याकडे अनेक कोकणी लोकांचे लक्ष लागलेले आहे. कारण गणपती, होळी आणि शिमगा या सणांसाठी हे रस्ते गावी जाणाऱ्या लोकांसाठी खूप त्रासदायक ठरत आहेत. या महामार्गाचे काम चालू असल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्याचप्रमाणे कधी कधी या कामामुळे वाहतूक कोंडी देखील होत आहे. परंतु आता नागरिकांचे हे प्रश्न लवकरच सुटणार आहे. मुंबई, गोवा या महामार्गाचे काम येत्या जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिलेली आहे.
काय म्हणाले नितीन गडकरी ? | Mumbai – Goa Expressway
नितीन गडकरी यांनी सांगितले की, “चिपळूणचा उड्डाणपूल सोडून मुंबई गोवा महामार्गाचे संपूर्ण काम जून अखेरीस पूर्ण होणार आहे. मुंबई ते गोवा हा महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबईतून गोव्याला पोहोचणे अगदी 5 तासात शक्य होणार आहे. कोकणातील नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही पीव्हीटीमधून रोरो सेवा सुरू केली आहे. त्यामुळे तुम्ही वाहने थेट अलिबागला घेऊन जाऊ शकता. तसेच अलिबागवरून मुंबई गोवा महामार्गाला जोडले जाऊ शकता. मुंबईतून अलिबाग जो प्रवास रस्ते मार्गे साडेतीन तासांचा होता. तो आता 45 मिनिटात होतो. तसेच यामुळे कोकणातून मुंबईत व्यावसायिकांना येणाऱ्या व्यापाऱ्यास प्रवास सोपा होणार आहे.”
विरार ते दिल्ली महामार्ग | Mumbai – Goa Expressway
विरार ते दिल्ली या महामार्गाचे काम एनएचआय यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गाची काम होत असताना रोजगार निर्माण होणार आहे. या भागातील गरिबी देखील दूर होणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितलेले आहे.
मुंबई गोवा या महामार्गाची काम चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतिक कोंडी होते. आणि त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. तसेच आता गणेश उत्सवाच्या अगोदर मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले तर प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. महामार्गाच्या कामामुळे कित्येक तास नागरिकांना ट्रॅफिकमध्ये अडकून बसावे लागते.
गणेशोत्सव कधी आहे?
यावर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी असून 16 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार आता यावर्षी गणेश उत्सवाच्या आधीच मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होणार आहे. आणि या मार्गाने आता नागरिकांना प्रवास देखील करता येणार आहे.




