मलाही एका मोठ्या पक्षाने उमेदवारीची ऑफर दिली होती पण..; किरण मानेंचा मोठा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मध्यंतरीच मराठी कलाकार किरण माने यांने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तेव्हापासून किरण माने राजकीय क्षेत्रात हे सक्रिय असल्याचे दिसून येत आहेत. अशातच किरण माने (Kiran Mane) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “लोकसभा निवडणुकीच्या काळात मलाही एका मोठ्या पक्षाकडून तिकिटासाठी विचारणा करण्यात आली होती” असे किरण माने यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता किरण माने यांना ऑफर देणार हा पक्ष नेमका कोणता होता?? याबाबत विचारणा केली जात आहे.

एका यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत बोलताना किरण माने यांनी सांगितले की, “लोकसभा निवडणुकीसाठी मला विचारणा झाली होती. भारतातील एका मोठ्या आणि जुन्या पक्षाच्या नेत्याने मला उमेदवारीबाबत विचारले होते. त्याने सांगितलेला मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ होता. या उमेदवारीबाबत मला विचारणा झाल्यानंतर मी त्या ऑफरला नकार दिला होता. कारण, मी विद्रोही आहे पण द्रोही नाही”

त्याचबरोबर, “या उमेदवारीच्या ऑफरची माहिती मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली. मला उमेदवारी शिवसेना पक्षाकडून असती तर मी स्विकारली असती. पण, ती दुसऱ्या पक्षाची होती. उद्धव ठाकरे यांना मी तुम्हाला सोडून जाणार नाही असे म्हटले. या उमेदवारीच्या ऑफरबाबत सुषमा अंधारे आणि उमेदवारीची ऑफर करणाऱ्या पक्षाच्या नेत्याला याची कल्पना होती.” असेही किरण माने यांनी मुलाखतीत बोलताना सांगितले.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटात प्रवेश का केला?? या प्रश्नावर उत्तर देताना किरण माने यांनी म्हटले की, “शिवसेनेत सरंजामी विचारसरणी नाही. बहुजनवादी विचारांच्या जवळ जाणारा शिवसेना पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करताना मी उद्धव यांना प्रबोधन ठाकरे यांचे हिंदुत्व मान्य असून त्यांना पुढे घेऊन जाणार असल्याचे सांगितले. त्यावर उद्धव यांनीही मीदेखील तोच विचार घेऊन जात असल्याचे सांगितले.”