मुंबई-गोवा महामार्गावर Toilet साठी थांबले..तितक्यात मागून आलेल्या ट्रेलरने उडवलं, 1 ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायगड : हॅलो महाराष्ट्र – मुंबई गोवा हायवेवर एक विचित्र दुर्घटना घडली आहे. यामध्ये लघुशंका करण्यासाठी गाडीतून खाली उतरलेल्या तिघा तरुणांना ट्रेलरने उडवले आहे. मुंबई गोवा महामार्गावर गुरुवारी सकाळी सात वाजता हि दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी अपघातामध्ये एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व मित्र अर्टिगा कारने ठाण्याहून मालवणच्या दिशेने प्रवास करत होते. मात्र मालवणला पोहोचण्याच्या अगोदरच यामधील एकाला मृत्यूने गाठले. या तिघा मित्रांच्या अपघातामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके ?
मुंबई गोवा महामार्गावर सकाळी सात वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. ठाण्याहून मालवणला जाणाऱ्या अर्टिगा गाडीतील तिघे जण लघुशंका करण्यासाठी गाडीतून खाली उतरले होते. यादरम्यान मुंबईच्या बाजूने येणाऱ्या ट्रेलरने या तिघांना धडक दिली. यानंतर या ट्रेलरने रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या त्यांच्या अर्टिगा कारलासुद्धा धडक दिली.

एकाचा मृत्यू तर दोघे जखमी
या अपघातात अमित विनोद कवळे याचा जागीच मृत्यू झाला आहे तर टेरेस करवालो आणि रोहन जाधव हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारांसाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment