Mumbai Goa Highway :मुंबई – गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर टप्प्याचे काम कधीपर्यंत होणार पूर्ण ? आली नवी अपडेट !

0
1
mumbai - goa highway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) सुरू आहे. या प्रकल्पातील पनवेल ते इंदापूर टप्प्याचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. सध्या पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या टप्प्यात सेवा रस्त्यांचे काम प्रगतीपथावर आहे, तसेच मुख्य रस्त्याचे पी क्यू सी काम पूर्ण झाले असल्याची माहिती प्राधिकरणाने दिली आहे.

चौपदरीकरण प्रकल्पाची प्रगती (Mumbai Goa Highway)

पनवेल ते इंदापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या चौपदरीकरणाचे काम दोन टप्प्यांमध्ये विभागले गेले आहे पहिले पनवेल ते कास (42 किमी)
आणि दुसरे कास ते इंदापूर (42 किमी). या प्रकल्पात मुसळधार पाऊस आणि हवामानाचा विचार करून मजबूत काँक्रीट रस्ते तयार केले जात आहेत. ज्यामुळे रस्ता टिकाऊ व मजबूत होईल. रस्त्याच्या तळाशीही टिकाऊ काँक्रिटीकरण करण्यात येत आहे, जे रस्त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरते.

पनवेल ते कास टप्पा (42 किमी) (Mumbai Goa Highway)

कामाची जबाबदारी: सुरुवातीला सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे होती. परंतु, अटी पूर्ण न केल्यामुळे नोव्हेंबर 2021 मध्ये करार रद्द करण्यात आला. नवीन कंत्राट: जानेवारी 2023 मध्ये JM म्हात्रे कंपनीला 151.26 कोटी रुपयांच्या करारासह हे काम देण्यात आले. मुख्य रस्त्याचे पांढऱ्या टॉपिंगचे काम पूर्ण झाले असून फक्त एका अंडरपासचे काम बाकी आहे. सेवा रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून चारही लेन वाहतुकीसाठी खुल्या आहेत.

कास ते इंदापूर टप्पा (42 किमी)

ऑक्टोबर 2022 मध्ये मेसकल्याण टोलवे कंपनीला 332 कोटी रुपयांच्या करारासह हे काम देण्यात आले. नोव्हेंबर 2022 मध्ये अधिकृत कामाला सुरुवात झाली. 42.3 किमीपैकी 30 किमी मुख्यमार्गाचे काँक्रीट काम पूर्ण झाले आहे. रस्ता वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात आला आहे, त्यामुळे स्थानिकांना काही अडचणी येत नाहीत. पनवेल ते इंदापूर दरम्यान शिल्लक राहिलेले काम 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे पनवेल-इंदापूर चौपदरीकरण प्रकल्प प्रगतीपथावर असून, काम वेळेत पूर्ण होण्यासाठी प्राधिकरण सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रकल्पाच्या पूर्णतेनंतर प्रवाशांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद होईल.