हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा प्रवाशांसाठी मोठी खुशखबर मिळणार आहे. तब्बल 13 वर्षांपासून सुरु असलेले मुंबई-गोवा NH 66 राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे. अन येत्या 9 महिन्यातच हा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. तसेच या महामार्गामुळे प्रवासाचा कालावधी 13 तासावरून फक्त 5 ते 6 तास होणार आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना हे ऐकून आनंद झाला आहे कि , सुमारे 460 ते 471 किलोमीटरची लांबीचे अंतर निम्या वेळेत गाठता येणार . तर नेमका हा प्रकल्प काय आहे , तो कुठून गेलाय , आणि प्रवाशांना काय फायदा होणार आहे , हेच आपण आज जाणून घेणार आहोत. तर चला याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
महामार्ग डिसेंबर 2025 पर्यंत सुरु होणार –
विधानसभेच्या तारांकित प्रश्नांमध्ये आमदार रोहित पवार अन इतर सदस्यांनी या महामार्गाच्या प्रलंबित कामाबद्दल प्रश्न मांडला. त्यावेळी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून बांधकाम विभागमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महत्वाची माहिती सांगितली ,त्यात ते म्हणाले कि, “हा महामार्ग डिसेंबर 2025 पर्यंत सुरु केला जाईल”. त्यामुळे मागील काही वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. तसेच आतापर्यंत या राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 15 हजार 600 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत.
NH 66 ‘या’ प्रमुख शहरांना जोडणार –
हा NH 66 महामार्ग प्रमुख शहरांना अन गावांना जोडणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पनवेल , पेण, माणगाव, महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, पणजी, कानाकोना आणि मरगाव यांचा समावेश आहे. महाराष्ट्रासोबतच हा मार्ग गोवा , कर्नाटक, केरळ,तामिळनाडूतील लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
पूल-उड्डाणपुलांचे काम –
84.60 किमी लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण – 74.80 किमी पूर्ण, उर्वरित 42.3 किमी लांबीचे पूल-उड्डाणपुलाचे काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होणार.
कासू ते इंदापूर रस्ता – 42.3 किमी लांबीच्या मार्गावरील पूल-उड्डाणपुलांचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल.
कशेडी घाट चौपदरीकरण – एका बोगद्याचे काम पूर्ण झाल्यामुळे वाहतूक सुरू केली आहे. तसेच दुसऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून मार्च 2025 अखेर वाहतुकीसाठी खुले केले जाणार.