Mumbai : मुंबई राज्यातील केवळ एक महत्वाचे शहर नसून आर्थिक उलाढालीचे प्रमुख केंद्र देखील आहे. मुंबई झपाट्याने विकसित होत असून मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर शासनाचा भर आहे. म्हणूनच मुंबईत रोड आणि पूल प्रोजेक्ट हाती घेतले जात आहेत. आता मुंबईतील आणखी एक महत्वाचा पूल लवकरच खुला केला जाणार असून त्यामुळे 45 मिनिटांचे आंतर केवळ 15 मिनिटात पार होऊ शकणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा (Mumbai) वेळ निश्चितच वाचणार आहे. हा पूल नेमका कोणता आहे ? त्यामुळे कोणत्या भागातील रहिवाशांना याचा लाभ होणार आहे चला जाणून घेऊया…
प्रवासाचा कालावधी होणार कमी
हा ब्रीज खुला झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी कमी होणार असून अंधेरी पश्चिमपासून वेस्टर्न एक्पप्रेस वे पर्यंत जुहूपर्यंतचा 9 किमी अंतर केवळ 15 मिनिटात पार करता येणार आहे. या पुलाचा वापर करून चालक वेस्टर्न एक्स्प्रेस वेवरुन तेली गल्ली ब्रिजवरुन गोखले ब्रिज पार करुन बर्फीवाला पुलावरुन (barfiwala flyover) थेट जुहूपर्यंत पोहचू शकणार आहेत. सध्या हे 9 किमीपर्यंतचे अंतर पार करण्यासाठी वाहन (Mumbai) चालकांना 45 मिनिटांचा वेळ लागतो. पूल खुला झाल्यानंतर 15 मिनिटांत हे आंतर पार होणार आहे.
हायड्रॉलिक जॅक आणि एमएस स्टूल पॅकिंगचा वापर (Mumbai)
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने बुधवारी सांगितले की अंधेरी गोखले पुलाचा एक भाग सीडी बर्फीवाला उड्डाणपुलाशी यशस्वीरित्या संरेखित करण्यात आला आहे आणि 1 जुलै रोजी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीएमसीने एका निवेदनात म्हटले आहे की सीडी बर्फीवाला उड्डाणपूल उचलण्याचे आणि गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या (Mumbai) समांतर संरेखित करण्याचे आव्हानात्मक काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. हायड्रॉलिक जॅक आणि एमएस स्टूल पॅकिंग वापरून काम पूर्ण करण्यात आले.
या दिवशी पूल होणार खुला (Mumbai)
बर्फीवाला उड्डाणपुलाचा एक भाग एका बाजूला 1,397 मिमी आणि दुसऱ्या बाजूला 650 मिमीने उंचावला होता. बीएमसी ने सांगितले की , “या जोडणीच्या कामासाठी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सूक्ष्म-स्तरीय नियोजन आणि अथक प्रयत्नांना या महत्त्वाच्या टप्प्यात यश मिळाले आहे. काँक्रिटीकरणाच्या कामानंतर या दोन्ही पुलांवरील वाहतूक 1 जुलै 2024 रोजी खुली करण्याची तयारी सुरू आहे. अंधेरीतील गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला उड्डाणपूल (Mumbai) अंधेरी पूर्व आणि पश्चिमेकडील वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण आहेत.