“मुंबईने तुफानाला प्रत्येकवेळी झेललं आहे”; अमृता फडणवीसांच्या ट्विटला रुपाली चाकणकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारवर अगोदरच भाजपकडून टीका केली जात आहे. अशात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या ट्विटला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिल आहे. “तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है. महाराष्ट्र इसके साथ तो हमेशा खेला है, साथ मैं हिंदोस्तां को भी संभाला है !!” असं शायरीतून म्हणत रुपाली चाकणकरांनी अमृता फडणवीस यांना टोलाही लगावला आहे.

नुकतेच तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला. अनेक ठिकाणी या वादळामुळे वृक्ष कोसळले. तसेच पिकांचेही नुकसान झाले. अशा परिस्थितीत मुंबई व राज्यातील महाविकास आघाडी सरकारबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक शायरी करीत ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला. त्यांच्या या ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनीही जोरदार शायरी करुनि त्यातून फडणवीस यांना टोला लगावला आहे.

चाकणकरांनी ट्विटमधून त्यांनी “तुफान तर या शहरात नेहमीच येत राहतात. महाराष्ट्र अशा प्रकारच्या तुफानांसोबत नेहमीच खेळत आहे. त्यासोबत भारतालाही सांभाळ आहे,” असे म्हणत चाकणकरांनी मुंबईबद्दल फडणवीसांना टोला लगावला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

You might also like