हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई केली. यानंतर या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी. उच्च न्यायालयाने नाशिक पोलिसांना राणेंवर कोणत्याही स्वरूपाची कारवाई न करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती नारायण राणे यांच्या वकिल अॅड. अनिकेत निकम यांनी दिली.
नारायण राणे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुंसवनी पार पडली. याप्रकरणी आज राणेंच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी ऍड. अनिकेत निकम म्हणाले की, २३ सप्टेंबर रोजी केलेल्या वक्तव्या स्वरूपात मंत्री राणेंवर जे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी जी केलेली कारवाई हि बेकायदेशीर स्वरूपाची आहे. या प्रकरणी आम्ही आज उच्च न्यायालयात याचिका दाखल केली तसेच मंत्री राणेंची बाजू मांडली. तसेच त्यांच्यावर दाखल केलेली गुन्हे आहेत. याबाबतची आमच्या बाजूने सविस्तर स्वरूपात माहितीही दिली.
दरम्यान मंत्री राणेंच्या वकिलांनी सांगितले की, सध्या सुनावणी पार पडली असून या संदर्भात आता पुढील सुनावणी हि १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यावेळी मंत्री राणेंच्या बाबतकाही निर्णय असतील तर ते पुढीलही सुनावणीत घेतले जातील, असे मंत्री राणेंच्या वकिलांनी सांगितले.