वारंवार बोलावूनही पत्नी माहेरून येत नव्हती; यानंतर पतीने केले असे काही कि….

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील कांदिवलीमध्ये एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. यामध्ये वारंवार बोलावूनही माहेरी गेलेली पत्नी घरी परतत नव्हती. यानंतर या महिलेच्या पतीने संतापून या महिलेचा आक्षेपार्ह व्हिडीओ स्टेटसला ठेवला. या प्रकरणाची माहिती पत्नीला कळताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पत्नीने केलेल्या तक्रारीवरून मालाडमधील कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
कांदिवलीत राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीचा विवाह 2015 मध्ये भिवंडीतील तरुणाशी झाला. लग्नाच्या काही दिवसांनंतर पती, सासू, सासरे, नणंदेनं या तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. यानंतर या सगळ्यांच्या त्रासाला कंटाळून हि तरुणी माहेरी निघून आली. यानंतर काही दिवसांनी पतीनं तिची समजूत काढून तिला घरी आणले. यानंतर काही दिवसांनी त्यांना जुळी मुले झालीत.

यानंतर सुद्धा या महिलेचा सासरच्यांकडून छळ सुरूच होता. त्यामुळे या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर सामोपचारानं प्रकरण मिटले. त्यानंतर या दाम्पत्यानं स्वतंत्र घर घेतले. यानंतर काही दिवसांनी पतीने पुन्हा छळ सुरू केल्यानं हि महिला माहेरी निघून गेली. तिने घरी परत यावे म्हणून तिच्या पतीचे प्रयत्न सुरु होते. वारंवार बोलावूनही पत्नी माहेरून येत नव्हती म्हणून तो संतापला. यानंतर त्याने छुप्या पद्धतीनं काढलेला तिचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ स्टेटसला ठेवला. हा व्हिडीओ नातेवाईक आणि मित्र मंडळींनी पाहिला. या महिलेला हे समजताच तिने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

You might also like