हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली कपिटल्स विरुद्धच्या सामन्यात दिमाखदार विजय मिळवत मुंबई इंडियन्स तब्बल ३ सामन्यानंतर विजयाची चव चाखली. वानखेडे स्टेडियमवरील घरच्या मैदानावर मुंबईच्या संघाने दिल्लीचा ३३ धावांनी पराभव करत चाहत्यांना खुश केलं. या विजयसोबतच मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) एक सर्वात मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये १५० विजय मिळवणारी मुंबई इंडियन्स ही जगातील पहिली आणि एकमेव टीम ठरली आहे. मुंबईनंतर चेन्नई सुपर किंग्सचा नंबर लागत असून त्यांनी आत्तापर्यंत १४४ सामन्यात विजय मिळवला आहे.
मुंबई इंडियन्स हा आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ मानला जातो. आयपीएलच्या सुरुवातीपासून म्हणजे २००८ पासून नेहमीच मुंबईच्या संघात (Mumbai Indians) दिग्गज खेळाडूंचा भरणा पाहायला मिळाला आहे. सचिन तेंडुलकर, लसिथ मलिंगा, शॉन पोलॉक, सनथ जयसूर्या, हरभजन सिंग यांच्यापासून ते रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, मिचेल मॅकलॉघन, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या अशा अनेक खेळाडूंच्या मेहनतीने मुंबई इंडियन्सने १५० विजय मिळवण्याचा महारेकॉर्ड केला आहे. आयपीएल मध्ये तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तब्बल ५ वेळा ट्रॉफी जिंकत आपणच आयपीएलचा राजा असल्याचे दाखवून दिले आहे.
T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम– Mumbai Indians
मुंबई इंडियन्स- 150 विजय
चेन्नई सुपर किंग्ज – 148 विजय
भारत – 144 विजय
लँकेशायर- 143 विजय
नॉटिंगहॅमशायर- 143 विजय