हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अखेर गुरुवारी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) त्यांच्या चाहत्यांसाठी बहुप्रतिक्षित असलेले नवीन अँथम सॉंग(Anthem Song) ‘प्ले लाइक मुंबई’ (Play Like Mumbai) प्रदर्शित केले आहे. हे गाणे फक्त एक थीम सॉंग नसून ते मुंबईच्या जिगरबाज खेळाचा उत्साह आणि चाहत्यांच्या प्रेमाची झलक दाखवते. महत्वाचे म्हणजे, या गाण्यामध्ये बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आपल्याला हटके अंदाजात पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर हे गाणे देखील एका खूप खास व्यक्तीने गायले आहे.
‘प्ले लाइक मुंबई’ कोणी गायले आहे?
या गाण्याचे आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे हे गाणे प्रसिद्ध रॅपर सृष्टी तावडे (Shristi Tawde) हिने गायले आहे. ‘मैं नहीं तो कौन बी’ या गाण्यामुळे प्रकाशझोतात आलेल्या सृष्टीने या अँथमला खास मुंबईची शैली आणि दमदार रिदम दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्राच्या मनावर हे गाणे चांगलेच कोरले गेले आहे.
पहिला सामना केव्हा आणि कुठे असणार?
सध्या सर्वच चहात्यांना आयपीएलची उत्सुकता लागून राहिली आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे. हा हाय व्होल्टेज सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल.
पहिल्या सामन्यात पांड्या नसणार
मुंबई इंडियन्ससाठी पहिल्या सामन्यापूर्वीची मोठी बातमी म्हणजे संघाचा कर्णधार हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तो चेन्नईविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. या निर्णयामुळे मुंबईच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे. मात्र संघ व्यवस्थापनाने तातडीने निर्णय घेत, सूर्यकुमार यादवला पहिल्या सामन्यासाठी कर्णधार म्हणून नेमले आहे.
मुंबई इंडियन्स – 5 वेळा चॅम्पियन संघ
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दोघेही 5 वेळा विजेते ठरले आहेत. मुंबईने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये विजेतेपद पटकावले होते. मात्र, 2024 च्या हंगामात हार्दिक पांड्याला कर्णधारपद देण्यात आले. यंदा संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Game ho ya life, we 𝑷𝑳𝑨𝒀 𝑳𝑰𝑲𝑬 𝑴𝑼𝑴𝑩𝑨𝑰 🔥💙#MumbaiIndians #PlayLikeMumbai pic.twitter.com/UYE3HAJF8N
— Mumbai Indians (@mipaltan) March 20, 2025
मुंबई इंडियन्सचा 2025 साठीचा संघ
यंदाच्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने एक भक्कम संघ तयार केला आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, टिळक वर्मा, बेव्हन जेकब्स, रायन रिकेल्टन, रॉबिन मिनेस, कृष्णन सृजित, हार्दिक पांड्या, नमन धीर, राज बावा, विघ्नेश पुथूर, विल जॅक, मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अश्विनी कुमार, रीस टोपली, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, सत्यनारायण राजू, मुजीब उर रहमान ही सगळी मंडळी आहेत.