मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ; ‘हुकमी एक्का’ स्पर्धेबाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएल २०२० सुरू व्हायच्या आधीच गतविजेत्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. मुंबई साठी नेहमीच हुकमी एक्का ठरलेला तेज गोलंदाज लसिथ मलिंगाने यंदाच्या वर्षी आयपीएल मधून माघार घेतली आहे. मुंबईच्या टीममध्ये मलिंगाच्याऐवजी ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जेम्स पॅटिनसन याची निवड करण्यात आली आहे. वैयक्तिक कारणांमुळे मलिंगा यंदाच्या हंगामात खेळू शकणार नाही, तो त्याच्या कुटुंबासोबत श्रीलंकेमध्ये असेल, असं मुंबईच्या टीमने सांगितलं आहे.

‘लसिथ मलिंगा हा मुंबईच्या टीमचा महत्त्वाचा खेळाडू आणि टीमचा आधार आहे. आम्ही मलिंगाची उणीव आम्हाला या मोसमात नक्कीच जाणवेल. पण मलिंगाचं त्याच्या कुटुंबासोबत असणं जास्त महत्त्वाचं आहे. जेम्स पॅटिनसन आमच्या टीमसाठी योग्य आहे, तसंच आमच्या फास्ट बॉलरमध्ये तो एक चांगला पर्याय आहे,’ असं मुंबईच्या टीमचे मालक आकाश अंबानी म्हणाले.

लसिथ मलिंगाचे वडिल आजारी आहेत, त्यांच्यावर काही दिवसांमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे, त्यामुळे मलिंगा आयपीएलसाठी दुबईला जाणार नसल्याचं बोललं जातंय. कोरोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल युएईमध्ये खेळवली जाणार असून १९ सप्टेंबरपासून आयपीएललला सुरुवात होणार आहे, पण अजूनही स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आलेली नाही.

Leave a Comment